Maharashtra Lok Sabha Polls 2024 phase 2 tomorrow voting in Wardha constituency
Maharashtra Lok Sabha Polls 2024 phase 2 tomorrow voting in Wardha constituency Saam Digital
लोकसभा २०२४

Wardha Election 2024 News: वर्धा लोकसभेसाठी 24 उमेदवार रिंगणात, उद्या 1997 केंद्रावर मतदान 6049 कर्मचारी तैनात

Siddharth Latkar

- चेतन व्यास

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यात वर्धा लोकसभा मतदारसंघकारिता (उद्या, 26 एप्रिल) मतदान होणार आहे. वर्धेत मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून मतदान केंद्रावर मतदानाचे साहित्य घेऊन पथक रवाना हाेऊ लागली आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण 1997 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा')

वर्धा लोकसभा मतदारसंघात यंदा 24 उमेदवार रिंगणात आहे. यात भाजपाचे रामदास तडस (ramdas tadas) व शरद पवार गटाचे अमर काळे (amar kale) यांच्यात काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

यात वर्धा जिल्ह्यातील चार तर अमरावती जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यात वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव व मोर्शी या मतदारसंघाचा समावेश आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघ

एकूण उमेदवार - 24

एकूण मतदार - 1682771

नवमतदार - 24873

एकूण मतदान केंद्र - 1997

पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात- 6049

प्रशासनाची जय्यत तयारी

जिल्ह्यात या यंदा मतदानाची टक्केवारी वाढावी या करीता जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारे जनजागृती केलीय. सोबतच यंदा महिला द्वारा संचालित, युवकांद्वारा संचालित व इतर सजावट केलेली मतदान केंद्र सुद्धा तयार करण्यात आली आहे.

दिव्यांग बांधवाना मतदान केंद्रा पर्यंत पोहचविण्यासाठी वाहनची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. आता नागरिक उद्या मतदानाला किती प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic Jam: जाणवली ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक राेखली, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

Ghatkopar Hording Collapse: धक्कादायक! घाटकोपर दुर्घटनेतील इगो मीडिया कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग्स; पालिकेचा कारवाईचा इशारा

Lady Finger Benefits: गंभीर आजार होतील छू मंतर; भेंडी खाण्याचे जबरदस्त फायदे

Today's Marathi News Live: पुण्यात तिसऱ्या दिवशी हत्येची घटना, डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

Engagement Ring Designs : साखरपुड्यासाठी लेटेस्ट रिंग डिझाइन

SCROLL FOR NEXT