शिवसेनेत, मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपमध्ये गेले, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी. असा दबाव उद्धव ठाकरेंवर टाकण्याची हिंमत कधीच कोणाची झाली नाही. लोकसभा हा तर ट्रेलर आहे. विधानसभेत पूर्ण पिक्चर पहायला मिळेल, असं म्हणत अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे गटाला डिवचलं आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना हिंगोलीमधून जाहीर झालेली उमेदवारी काढून घेण्यात आली आहे. तसेच यवतमाळ वाशिममधून भावना गवळींचीही उमेदवारी कापण्यात आली आहे. मात्र हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता हिंगोली लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांना हिंगोलीचे तिकीट देण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील महायुतीकडून हिंगोली लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षाकडून जोरदार विरोध केला जात होता. तसेच उमेदवारी बदलण्याची मागणीही भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून करण्यात आली होती.
या मागणीनंतर आता हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. त्याच्याऐवजी शिंदे गटाचे बाबुराव पाटील कोहळीकर (Baburao Patil Kohlikar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाबुराव कोहळीकर यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.