Maharashtra Lok Sabha Election Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election : हातकणंगलेत तिरंगी लढतीची शक्यता; दिग्गज नेत्याच्या मुलानं ठोकला शड्डू

Hatkanangale Lok Sabha : राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा घेतला नाही तर या मतदारसंघात उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यातच आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे.

Sandeep Gawade

Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणूक जसजशी निवडणूक येईल तसतस राजकीय वातावरणही तापत आहे. राज्यातल्या महत्त्वाच्या मतदासंघांपैकी एक असलेल्या हातकणंगले मतदारसंघातही मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा घेतला नाही तर या मतदारसंघात उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यातच आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे धैर्यशील माने, राजू शेट्टी आणि राहुल आवाडे यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. राहुल आवाडे यांच्या निर्णयामुळे महायुतीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र महायुतीतून उमेदवारी जाहीर करताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे आता थांबणं अशक्य असल्याचं राहुल आवाडे यांनी म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना देण्यासाठी इंडिया आघाडीत चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सामिल न होता, बाहेरून पाठिंबा मागितला होता. त्यानंतर जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांनी पाठिंबा घेतला नाही तर उमेदवार द्यावा लागेल असं म्हटलं होतं. त्यामुळे राजू शेट्टी एकटे निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. तर महायुतीतून हातकणंगलेची जागा शिंदे गटाला सुटली असून विद्यमान खासदार धैर्यशिल माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सदाभाऊ खोत यांनी देखील या मतदारसंघावर दावा केला होता. दरम्यान राहुल आव्हाडे यांच्या भूमिकेकडे राज्यासह जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने हातकणंगलेतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले असले तरी अद्याप उमेदवार काेण असणार हे अद्याप निश्चित केले नाही. परंतु मातोश्री वरून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT