लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. मात्र महायुतीच्या लोकसभा जागावाटपाचं तिढा अद्याप सुटलेला नाही. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत, ८० टक्के जागांवर निर्णय झालेला आहे, मात्र २० टक्के जागांवर अद्यापही तिढा सुटलेला नाही. त्यावर योग्य वेळी निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती दिली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जागांची घोषणा करण्याचा अधिकार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मागील काही दिवसांपासून जागावाटपावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबते सुरू आहेत. महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा जिंकण्यासाठी कमळ चिन्हावरच उमेदवार उभे करावे लागतील, असं मत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे शिंदे आणि पवार गटात नाराजीचा सूर असल्याची चर्चा होती.
गेल्या निवडणुकीत आम्ही ज्या जागा जिंकल्या आहेत, तेवढ्या जागांवर आम्हाला उमेदवारी द्यावी, असं शिंदे गटातील नेत्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्याच जागा आम्हालाही हव्या, असं अजित पवार गटाच्या नेत्यांनी म्हटलं आहे. मात्र ८० टक्के जागांमध्येही कोणाला किती जागा दिलेल्या आहेत हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
इलेक्ट्रोरल बॉण्डसमधून 70 टक्के पैसे इतर पक्षांना मिळाले आणि आम्हाला ३० ट्क्के पैसे मिळाले आहेत. राहुल गांधी पैसे परत करतील का? अशा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. ७०% पैसे मिळाले ते कोणाला धमकाउन मिळाले? ज्या राजकीय पक्षांना पैसे मिळाले ते बॅलन्सशीट मध्ये दाखवावे लागतात. काँग्रेसमध्ये ही पद्धत होती ११०० रुपये मिळाले की १०० पक्षाला द्यायचे आणि १००० रुपये खिशात ठेवायचे. राहुल गांधीच जे वक्तव्य येत आहे ते काळ्या पैशांसांठी तडफड होत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
सीएएवरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. क्षरणार्थी म्हणून भारतात आलेल्यांना त्यांना भारतात सिटिझनशिप द्यायची हा कायदा आहे. पण उद्धव ठाकरे याचं उत्तर देऊ शकत नाहीत, कारण त्यांना एक विशिष्ट वोट बॅक हवी आहे आणि त्यावर त्यांच लक्ष आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.