Maharashtra Lok Sabha Election  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election : दिंडोरीत भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, भाजपचा मोठा नेता बंडखोरीच्या पवित्र्यात

Lok Sabha Election Election : भाजपकडून दिंडोरी मतदारसंघात उमेदवारीसाठी इछुक उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. भाजपने भारती पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज हरिश्चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनही उमेदवारीसाठी प्रयत्न केला होता.

Sandeep Gawade

Maharashtra Lok Sabha Election

भाजपकडून दिंडोरी मतदारसंघात उमेदवारीसाठी इछुक उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. भाजपने भारती पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज हरिश्चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनही उमेदवारीसाठी प्रयत्न केला होता. मात्र आज शरद पवार गटाने भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण निवडणुकीला अपक्ष सामोरं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या भारती पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत विद्यमान खासदार असताना हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी कापून भारती पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 2009 मध्ये भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवळ यांचा 37 हजार 347 मताने पराभव केला होता. तर 2014 मध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ.भारती पवार यांचा 1 लाख 47 हजार 619 मताधिक्याने पराभव केला होता. तर 2019 मध्ये भाजपाच्या तिकिटावर डॉ.भारती पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनराज महाले यांचा 1 लाख 98 हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला होता. त्यामुळे आदिवासीबहुल या मतदारसंघावर २००९ पासून भाजपचंच वर्चस्व राहिलेलं आहे.

आता भारती पवार यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार झाल्यानं त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाची संधी देखील मिळाली आहे. दिंडोरीतून हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपकडून विजयाची हॅट्रिक केली होती. मात्र, 2019 च्या निवडणुकीत भाजपनं विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना ब्रेक देत त्यांच्याच विरोधात 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी करत पराभूत झालेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी देत निवडणूक रिंगणात उतरवले. डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनराज महाले यांचा 1 लाख 98 हजारांच्या मताधिक्क्यानं पराभव केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Down: व्हॉट्सअॅप अचानक डाऊन, सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत वाहन पलटी; १०-१२ जण जखमी... वाहनातून गणेश मूर्ती पडली

IRCTC Jyotirlinga Yatra: बम बम भोले! भारतीय रेल्वेची ज्योतिर्लिंग यात्रा, कसं कराल तिकीटाचं बुकिंग, जाणून घ्या यात्रेची संपूर्ण माहिती

Shirpur : सुरुंग फुटून अंगावर पडला दगड; शिरपूर तालुक्यातील जवानाला लद्दाख येथे वीरमरण

Gardening Tips : या सोप्या टिप्स वापरून घरीच उगवा हिरवीगार पालक

SCROLL FOR NEXT