Maharashtra Lok Sabha Election Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election : राज्यातील काँग्रेसच्या उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर; दोन महिला उमेदवारांना संधी, कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

Lok Sabha Election २०२४ : लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारी संदर्भात दिल्ली वरिष्ठ पातळीवर आज पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत महाराष्ट्रातील सात नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यात प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकर या दोन महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Lok Sabha Election

लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारी संदर्भात दिल्ली वरिष्ठ पातळीवर आज पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत महाराष्ट्रातील सात नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यात प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकर या दोन महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. प्रणिती शिंदे यांना सोलापूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

संभाव्य उमेदवार

पुणे - रवींद्र धनगेकर

गडचिरोली - नामदेव किरसंड

सोलापूर - प्रणिती शिंदे

नंदुरबार - गोवाल पाडवी

अमरावती - बळवंत वानखेडे

कोल्हापूर - शाहू छत्रपती

चंद्रपूर - विजय वडेट्टीवार?

भंडारा गोंदिया - नाना पटोले?

चंद्रपूर आणि भंडारा - गोंदिया जागेचा तिढा कायम

लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे दिल्लीत सध्या मोठ्या घडामोडी घडतायेत. दरम्यान आज दिल्लीत काँग्रेसची वरिष्ठ पातळीवर बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांच्यासह वर्षा गायकवाड, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते. या बैठकीत एकूण ७ जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यात काँग्रेसकडून लोकसभेसाठी दोन महिलांची नाव निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये चंद्रपूर मधून प्रतिभा धानोरकर, तर सोलापूर मधून प्रणिती शिंदे यांचाय समावेश आहे. दरम्यान याबाबात उद्या गुरुवारी ३.३० वाजता पुन्हा बैठक होणार असून त्यावेळी अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे आघाडीतील एकाही पक्षाने अद्याप उमेदवारी जाहीर केलेले नाही. अशातच काँग्रेस नेत्यांची राजधानी दिल्लीत महत्त्वाची बैठक सुरू असून आज काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता होती. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते काल तडकाफडकी दिल्लीत दाखल झाले होते.

मंगळवारी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक झाली. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी महाराष्ट्राच्या नेत्यांसोबत ही बैठक सुरू असून राज्यांतील उमेदवारीसंदर्भात अद्याप तिढा सुटलेला नाही. इकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठकांवर बैठक सुरू आहेत. मात्र अद्याप ४-५ जागांवर पेच कायम आहे. एकीकडे ही स्थिती असताना उद्धव ठाकरे मात्र आपल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला ट्रम्प यांचा फोन, नेमकी काय झाली चर्चा?

Shukra Gochar 2025: ऑक्टोबरमध्ये धनदाता शुक्र ४ वेळा बदलणार रास; 'या' राशींच्या घरी येणार पैसा

Success Story: शिक्षणासाठी घरापासून लांब राहिली, एकदा नव्हे तर दोनदा क्रॅक केली UPSC; IAS नम्रता जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update: अमरावती-मुंबई-अमरावती विमानसेवेच्या वेळापत्रकात मोठा बदल

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT