Uddhav Thackeray Vs Eknath Shinde  Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: जनता ठरवणार खरी शिवसेना कुणाची? जनतेच्या कोर्टात शिंदे-ठाकरेंचा निकाल; 13 मतदारसंघांमध्ये दोन्ही गट आमनेसामने

Lok Sabha Election 2024 Results: शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगानं मूळ पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंच्या हाती सोपवलं. मात्र आता १३ मतदारसंघांमध्ये शिवसेना विरूद्ध शिवसेना असा सामना रंगलाय.

Vinod Patil

एक्झिट पोलच्या आकड्यांमुळे महाराष्ट्रात महायुती आणि मविआत चुरशीचा सामना होणार असल्याचं चित्र पुढं आलंय. मात्र या आघाड्यांच्या संघर्षात सर्वाचं लक्ष लागलंय ते राज्यातल्या 48 पैकी सर्वाधिक हाय होल्टेज ठरलेल्या 13 मतदारसंघांकडे.

कारण खरी शिवसेना कुणाची हे 13 मतदारसंघातले शिवसैनिक आणि जनता ठरवणार आहे. राज्यातल्या 13 जागांवर ठाकरे गट आणि शिंदे गटात सरळ लढत होते आहे. या मतदारसंघांमध्ये धनुष्यबाण सरस ठरणार की, मशाल याचीच परीक्षा या निवडणुकीत होत आहे, कोणते आहेत हे 13 मतदारसंघ ते जाणून घेऊ...

ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला समजला जातो. यात शिंदे गटाचे नरेश म्हस्के विरुद्ध ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्यात सामना रंगणार आहे.

1) ठाणे - नरेश म्हस्के (शिवसेना) विरुद्ध राजन विचारे (ठाकरे गट)

2) उत्तर पश्चिम मुंबईत रवींद्र वायकर (शिंदे गटाचे) विरुद्ध अमोल कीर्तीकर (ठाकरे गट)

3) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे (शिंदे गट ) विरुद्ध अनिल देसाई (ठाकरे गट)

4) दक्षिण मुंबई - यामिनी जाधव (शिंदे गट ) विरुद्ध अरविंद सावंत (ठाकरे गट)

5) कल्याण - श्रीकांत शिंदे (शिंदे गट ) विरुद्ध वैशाली दरेकर (ठाकरे गट)

6) मावळ - श्रीरंग बारणे (शिंदे गट ) विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील (ठाकरे गट)

7) नाशिक - हेमंत गोडसे (शिंदे गट ) विरुद्ध राजाभाऊ वाजे (ठाकरे गट) -

8) शिर्डी - सदाशिव लोखंडे (शिंदे गट ) विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट)

9) हातकणंगले - धैर्यशील माने (शिंदे गट ) विरुद्ध सत्यजीत पाटील (ठाकरे गट)

10) छत्रपती संभाजीनगर - संदिपान भुमरे (शिंदे गट ) विरुद्ध चंद्रकांत खैरे (ठाकरे गट)

11) हिंगोली - बाबूराव कदम (शिंदे गट ) विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर (ठाकरे गट)

12) बुलडाणा - प्रतापराव जाधव (शिंदे गट ) विरुद्ध नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट)

13) यवतमाळ - वाशिम राजश्री पाटील (शिंदे गट ) विरुद्ध संजय देशमुख (ठाकरे गट)

बरोबर दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर निवडणूक आयोगानं मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला सोपवलं. मात्र गेल्या दोन वर्षानंतर राज्यात पहिल्यांदाच मोठी निवडणूक होतेय. त्यामुळे आयोगाचा निकाल सामान्य शिवसैनिक आणि जनतेला मान्य आहे का याचीच कसोटी लोकसभा निवडणूक निकालात लागणार आहे. त्यामुळे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष या 13 मतदारसंघांकडे लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांवर बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, म्हणाले- ते महाजातीयवादी...VIDEO

Bike Ride: ९० ते १२२ बीएचपी पॉवर असलेल्या बजेट परफॉर्मन्स बाईक्स, रायडिंगसाठी सर्वोत्तम पर्याय

'मला CM करा, आमचा गट भाजपात विलिन करतो..' एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? ठाकरे गटाच्या खासदारानं सांगितलं कारण..

Sanjay Gaikwad: राऊत यांच्या मायचा #@XXX..., संजय गायकवाड यांची जीभ घसरली

Patan Monsoon Tourism: पावसाळ्यात नटलेलं साताऱ्यातील पाटण; आवर्जून भेट द्यावी अशी पर्यटनस्थळं

SCROLL FOR NEXT