Maharashtra Lok Sabha Election 2024  Saam TV
लोकसभा २०२४

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

Maharashtra Lok Sabha 2024: महाविकास आघाडी आणि महायुतीतील ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. खर्चात तफावत आढळून आल्याने या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

Satish Daud

Maharashtra Lok Sabha Election 2024

महाविकास आघाडी आणि महायुतीतील ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. खर्चात तफावत आढळून आल्याने या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. ४८ तासांत नोटीसीला उत्तर द्यावं, अन्यथा खर्चातील तफावत तुम्हाला मान्य आहे असं समजलं जाणार, असंही नोटीसीत मांडण्यात आलं आहे.

महाविकास आघाडीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे, पुणे लोकसभा मतदारसंघाचे रविंद्र धंगेकर, महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीसा बजावल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार खर्चाची पहिली तपासणी ३ मे रोजी पार पडली. ⁠त्यानुसार उमेदवारांकडे असलेल्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवहीत आणि निवडणूक विभागाकडे असलेल्या शॅडो रजिस्टरमध्ये तफावत आढळून आली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्याकडून १९ लाख ६२ हजार १६० रुपये खर्च दाखविण्यात आला आहे, तर निवडणूक विभागाच्या नोंदवहीत ४३ लाख ९० हजार ८१ रुपये खर्च झाल्याची नोंद केली आहे. त्यामुळे आढळराव यांच्या हिशोबात २४ लाख २७ हजार ९२१ रुपयांची तफावत असल्याचे निष्पंन्न झाले आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे यांनी १५ लाख ६७ हजार ३६८ रुपये खर्च सादर केला आहे. तर, निवडणूक विभागाकडून ३५ लाख २२ हजार ८७१ रुपयांचा खर्च नोंदवला आहे. कोल्हे यांच्या हिशोबात १३ लाख ५४ हजार ३ रुपये इतक्या खर्चाची तफावत आहे.

⁠पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मोहोळ यांनी ३३ लाख १३ हजार ४०२ रुपयांचा खर्च दाखवला आहे. त्यांचा जवळपास २७ लाख २४ हजार २३२ रुपयांचा हिशोब जुळत नसल्याचे समोर आले आहे. ⁠तर महाविकास आघाडीचे धंगेकर यांच्या खर्चचा हिशेबही आयोगाच्या रजिस्टर सोबत जुळत नाही.

⁠त्यामुळे या चारही प्रमुख उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. येत्या ४८ तासाच्या आत या नोटीसीला उत्तर द्यावं, अन्यथा खर्चातील तफावत उमेदवारांना मान्य आहे असं समजलं जाणार, असं नोटीसीत मांडण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT