Shivaji Adhalarao Patil Vs Amol Kolhe Yandex
लोकसभा २०२४

Maharashtra Election 2024: शिरुरमध्ये राजकीय वातावरण तापलं; शिवाजी आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात वार-पलटवार

Shivaji Adhalarao Patil Vs Amol Kolhe: राज्यात सध्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना उधाण आलं आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात शिवाजी आढळरावपाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात नागरिकशास्त्रावरून चांगलीच जुंपली आहे.

Rohini Gudaghe

रोहिदास गाडगे साम टीव्ही, प्रतिनिधी

राज्यात सध्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना उधाण आलं आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात (Shirur Lok Sabha Constituency) वातावरण तापल्याचं दिसत आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात शिवाजी आढळरावपाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात नागरिकशास्त्रावरून चांगलीच जुंपली (Maharashtra Politics) आहे. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान उमेदवारांमध्ये एकमेकांविरूद्ध टीका टिप्पणी केल्याचं पाहायला मिळत आहे.

नागरिकशास्त्रात खासदारांनी जनतेची कामंच करायची नसतात, फक्त भाषणं करायची हे चालणार नाही असं म्हणत आढळरावपाटीलांनी कोल्हेंवर निशाना साधला आहे. तर आढळराव पाटलांना (Shivaji Adhalarao Patil Vs Amol Kolhe) प्रतिउत्तर देत अमोल कोल्हेंनी कुठलं नागरिकशास्त्र पहायचं, जनतेचं भलं बघायचं स्वत:च्या कंपन्यांचं नाही, हेच नागरिकशास्त्र महत्वाचं असल्याचं म्हणत प्रतिउत्तर दिलंय.

खासदार निवडणूक झाल्यावर लोकांमध्ये यायचंच (Lok Sabha Election 2024) नसतं. त्यानं दिल्लीत थांबायचं. लोकांच्या अडीअडचणीला जायचंच नाही, हे कोल्हेंचे म्हणणं पटतं का? असा सवाल आढळराव पाटलांनी केला आहे. यावेळी त्यांनी नागरिकशास्त्राचा धडा दिला. नागरिकशास्त्रात खासदारांनी कामंच करायची नसतात, फक्त भाषणं करायची यावरुन कोल्हेंनी आढळराव पाटलांना प्रतिउत्तर दिलं (Lok Sabha) आहे.

अमोल कोल्हे म्हणाले की, २०१३ ला कांद्याच्या माळा गळ्यात घालुन कांदा निर्यातबंदी करावी म्हणून आढळराव पाटलांनी (Shivaji Adhalarao Patil) संसदेत आवाज उठवला. पण शेतकरी पोरगा म्हणुन संसदेत निलंबन (Maharashtra Election) झालं, तरी कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतकऱ्यांची व्यथा मांडत राहिलो. हाच फरक आहे. कोल्हेंनी नागरिकशास्त्रात जनतेचं भलं बघायचं स्वतच्या कंपन्यांचे नाही, हेच नागरिकशास्त्र महत्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे .

नागरिकशास्त्रात खासदारांनी कामंच करायची नसतात फक्त भाषणं करायची, असा टोला शिवाजी आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना लगावला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माजी (Amol Kolhe) खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत आहे. हे दोघे उमेदवार शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध गावात प्रचार दौरे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT