Sharad Pawar Vs Raj Thackeray saam
लोकसभा २०२४

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तन्मय टिल्लू

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर राज ठाकरे आपल्या जाहीर प्रचार सभांमधून मविआच्या नेत्यांवर जोरदार हल्ले चढवत आहेत. मात्र त्यांचं मुख्य टार्गेट आहे शरद पवार. आपल्या प्रत्येक सभेत ते पवारांवर निशाणा साधत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये आता फूट पडलेली असली तरी फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्रात शरद पवारांनीच सुरूवात केल्याचा आरोप राज ठाकरेंनी ठाण्यातल्या सभेत केला.

राज ठाकरे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुण्यातल्या सभे शरद पवारांना डिवचण्यासाठी जातीच्या राजकारणावरून अजित पवारांवर स्तुतीसुमनं उधळली आणि जातीपातीच्या राजकारणाला पुन्हा पवारांना जबाबदार धरलं. राज ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देताना शरद पवारांनी मात्र आपल्या खास शैलीत राज ठाकरेंच्या राजकारणातल्या अस्तित्वारच प्रश्नचिन्ह लावलंय. शरद पवार नेमकं राज ठाकरेंवर काय बोलले पाहा.

पाच वर्षांपूर्वी 2019 च्या लोकसभेत राज ठाकरेंनी मोदींच्या विरोधात प्रचारसभा घेतल्या होत्या. मात्र त्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीला हवा तेवढा फायदा झाला नव्हता. आता राज ठाकरे मोदींच्या समर्थनात सभा घेत आहेत. त्यामुऴे मविआला या सभांमुळे किती नुकसान होणार हे निकालानंतरच स्पष्ट होईलच. मात्र त्यापूर्वीच पवारांनी राज ठाकरेंच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे राज ठाकरे शिवाजी पार्कातल्या सभेत काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

Maharashtra Weather: पुढील ५ दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून यलो अलर्ट जारी; वाचा आजचे हवामान

Horoscope Today : धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल, मानसिक ताण जाणवेल; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT