Raj Thackeray vs Uddhav Thackeray  saam Tv
लोकसभा २०२४

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Raj Thackeray : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजप आणि ठाकरे गटात थेट सामना रंगणार आहे.. भाजपकडून ज्येष्ठ नेते नारायण राणे तर ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत लोकसभेच्या रिंगणात उतरलेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कणकवली: रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचे नारायण राणेविरुद्ध ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यात लढत होतेय. मात्र असं असलं तरी या मतदारसंघातील प्रचाराच्या निमित्ताने ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामनाही रंगताना पाहायला मिळणार आहे. पाहुयात एक खास रिपोर्ट.

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजप आणि ठाकरे गटात थेट सामना रंगणार आहे.. भाजपकडून ज्येष्ठ नेते नारायण राणे तर ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत लोकसभेच्या रिंगणात उतरलेत. राणे आणि राऊंतांमध्ये ही लढत होणार असली तरी कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार आहे. विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी ३ मे रोजी उद्धव ठाकरेंची सभा झाली. तर दुसरीकडे शनिवारी ४ मे रोजी नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा कणकवलीमध्ये होणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधुंच्या तोफा धडाडल्यामुळे कोकणातलं राजकीय वातावरण तापणाराय.

राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांसाठी कोणत्या मतदारसंघात आणि कधी सभा घेणार आहे. त्यावर एक नजर टाकूया. एकंदरितच राज ठाकरे यांच्या एन्ट्रीने कोकणातील राजकीय वातावरण तापणाराय. त्यामुळे राज ठाकरे शिवसेनेतील जुन्या घटना सांगून उद्धव यांच्यावर निशाणा साधणार का? काही नवे गौप्यस्फोट करणार हे पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथमध्ये भाजप-अजितदादा गटाची युती होणार?

लाडक्या बहीण'साठी आनंदाची बातमी, काही तासात खात्यावर ₹१५०० येणार

Nankhatai Recipe : दिवाळीत लहान मुलांसाठी खास बनवा खुसखुशीत नानकटाई, तोंडात टाकताच विरघळेल

Katrina Kaif Pregnancy : "मुलगा असेल की मुलगी असेल गं?" कतरिना कैफच्या प्रेग्नेंसी बद्दल ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

Pune : पुण्यात खळबळ! शरद पवारांच्या आमदाराविरोधात गुन्हा, कारण काय?

SCROLL FOR NEXT