Maharashtra Election Madha constituency  saam tv
लोकसभा २०२४

Maharashtra Election: माढामध्ये कोणाचा होणार करेक्ट कार्यक्रम ? जानकरांच्या बैठकीत काय झाला निर्णय?

Maharashtra Election Madha constituency : राज्यातील लोकसभा निवडणूक ५ व्या टप्प्यात होणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठापणाला लावणारी ठरणार आहे.

Bharat Jadhav

Maharashtra Election Madha constituency:

यंदा लोकसभा निवडणुकीत माढामध्ये भाजपची कोंडी झालीय. माढा मतदारसंघातून भाजपने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र निंबाळकर यांच्या उमेदवारीला स्थानिकांनी तसेच उत्तम जानकारांच्या समर्थकांनी विरोध दर्शवलाय. या विरोधामुळे भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आज सोमवारी धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांची प्रमुख कार्यकर्त्यांसह वेळापूर येथे बैठक झाली. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससोबत जानकरांची बैठक झाली होती. त्यानंतर माढा लोकसभेबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आज निर्णय जाहीर करणार, असे उत्तम जानकर म्हणाले होते.

आज झालेल्या बैठकीत १९ तारखेला होणाऱ्या बैठकाची आढावा घेण्यात आला. तसेच आपल्या या बैठकीत भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास न जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खुद्द जानकर यांनी दिलीय. धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटाची वाट पकडलीय. उत्तम जानकर आणि आम्ही एकत्र आलो तर माळशिरसमधून सव्वा लाखाचा लीड घेऊ असं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं होतं.

उत्तम जानकर हे धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा देणार होते. उत्तम जानकर आणि आम्ही एकत्र आलो तर माळशिरसमधून सव्वा लाखाचा लीड घेऊ असं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं होतं. यामुळे जानकरसुद्धा भाजपची साथ सोडणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकरांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतरही जानकरांचे समर्थक नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.

जानकरांनी शरद पवार गटासोबत जावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत भाजपकडून काही चुका झाल्याचं फडणवीसांनी म्हटलं. मागील विधानसभा तसेच लोकसभेसाठी तिकीट देण्यात आलं पाहिजेत होतं, असं म्हणत यापुढे तुमचा योग्य सन्मान दिला जाईल, असं फडणवीसांनी म्हटलंय. त्यामुळे आज झालेल्या बैठकीत पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे पुढील वाटचाल कशी असेल याचा निर्णय १९ तारखेला होईल, असं जानकरांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रात भाजपच्या याशामागे आहेत २ सूत्रधार, अमित शहांनी दिली होती मोठी जबाबदारी

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

SCROLL FOR NEXT