Dindori Lok Sabha Election 2024 
लोकसभा २०२४

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

Dindori Lok Sabha Election 2024 : माकपला दिंडोरीची जागा सोडावी, अन्यथा शरद पवार गटाच्या उमेदवाराला पडणारच असा इशारा गावित यांनी दिला होता. मात्र आता जे पी गावित यांनी दिंडोरी लोकसभेतून माघार घेतलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोठ्या घडामोडी होत आहेत. शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाडणारचं, असं म्हणत निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या जेपी गावित यांनी आज अखेर माघार घेतलीय. विशेष म्हणजे ज्यांच्याविरुद्धात दंड थोपटले होते, त्यांच्या उमेदवाराला गावित यांनी पाठिंबा दिलाय. लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा दिलाय. यामुळे हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली असली तर भाजपसमोरील आव्हान मात्र कमी झालं नाहीये.

दिंडोरी मतदारसंघात भाजपकडून डॉ. भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. मात्र माकपला दिंडोरीची जागा सोडावी, अन्यथा शरद पवार गटाच्या उमेदवाराला पडणारच असा इशारा गावित यांनी दिला होता. मात्र आता जे पी गावित यांनी दिंडोरी लोकसभेतून माघार घेतलीय. दरम्यान, आपण माघार का घेतली याबाबत जे पी गावित आपली प्रतिक्रिया दिलीय. माकपतर्फे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र दिंडोरीची जागा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आली. राष्ट्रवादीचा एकाच उमेदवार पाहिजे, अशी विनंती राष्ट्रवादीकडून करण्यात आल्याचे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये आमदार आनंद बोंढारकरांच्या कार्यक्रमावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Yavatmal Blast : वेल्डिंग करताना स्फोट; २ जणांचा मृत्यू, यवतमाळमधील घटनेनं हळहळ

Pendant Chain Design: साध्या आणि सुंदर लूकसाठी ड्रेस किंवा साडीवर ट्राय करा ७ क्लासी पेंडंट चेन

लैंगिक अत्याचार प्रकरणातून काँग्रेस खासदाराची निर्दोष मुक्तता; हायकोर्टाचा निर्णय

HDFC Bank : रविवारी बँक सुरू राहणार HDFC बँकेने दिली मोठी अपडेट, वाचा कारण

SCROLL FOR NEXT