Pune Lok Sabha Constituency
Pune Lok Sabha Constituency Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Election 2024: पुण्यात लोकसभेचे 3 उमेदवार अन् 1 व्यासपीठ; पुण्यासाठी कुणाचं कोणतं व्हिजन?

Rohini Gudaghe

अक्षय बडवे साम टीव्ही प्रतिनिधी, पुणे

पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा वार्तालाप पाहायला मिळाला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha Constituency) तीनही उमेदवारांनी "पुण्याचं व्हिजन" मांडलं आहे. पुण्यातील श्रमिक पत्रकार संघात तीनही उमेदवारांनी एकत्रित संवाद साधला आहे. मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे आज एकाच मंचावर आले आहेत. त्यांनी पुणे शहरासाठीच त्यांचं व्हिजन सांगितलं आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) त्याचं पुणे व्हिजन स्पष्ट करताना म्हटले की, जे मी बोलणार आहे, तेच या दोघांनी बोललं आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. देशातील पहिली मेट्रो काँग्रेसने पळवली. कलमाडी साहेबानी पुण्याचा खरा विकास केला. ड्रग्स, पुण्याची गुन्हेगारी यावर मी सातत्याने बोलत (Maharashtra Election 2024) आहेत. पाण्याचा विषय कुठं आहे. फक्त घोषणा करतात, काम करत नाहीत असंही धंगेकर म्हटले आहे. पुण्यासाठी मनमोहन सिंग यांनी 350 कोटी रुपये दिले होते. आता आपल्या शहराला काय मिळत आहे, हे पाहणे गरजेचं आहे. विचारांची लढाई विचाराने लढायला हवी, असं त्यांनी म्हटलं आहे. देशात शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर (Maharashtra Election) आहेत, याकडे लक्ष द्यायला हवं. देशात शेतकरी, व्यापारी विद्यार्थी सगळे अडचणीत आहेत. जर 400 पार होणार असतील, तर इथून मी एकटा निवडणून आलो तर काय होतं असं देखील धंगेकर म्हटले आहेत.

पुणे लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी लोकसभा निवडणूकीसाठी त्यांचं व्हिजन सांगितलं आहे. ते म्हणाले की, माझं पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर असावं, असा आमचा प्रयत्न असणार आहे. आधी केंद्रात राज्यात आणि पालिकेत एकच सत्ताधारी (pune lok sabha) होते. त्यावेळी त्यांनी पुढच्या 50 वर्षांचा विचार केला नाही, असं मला वाटतं. कागदावरची मेट्रो आम्ही सत्यात आणली. आधीच्या लोकांनी अनेक कामाची फक्त उद्घाटन केली, कामं केली नाहीत. आम्ही करून दाखवलं, असं ते म्हणाले आहेत.

वाहतूक व्यवस्था सक्षम करावी लागेल. PMPL बसेस वाढवाव्या लागतील. शहरात मेट्रोचा विस्तार करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रिंग रोड पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल. नदी प्रकल्प पूर्ण (Maharashtra Politics) करणे. पुरंदरचं विमानतळ करावं लागेल. नवी मुंबई आणि पुण्याच विमानतळ रेल्वे मार्गाने जोडण्याचा प्रयत्न असणार आहे. स्वच्छ पुणे शहर करणं गरजेचं आहे. अनेक नॅशनल रिसर्च सेंटर आणणार आहे. IIT चे सेंटर पुण्यात करता येतील का पाहणं, असं देखील मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे (Vasant More) यांनी त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं आहे. शहरतील वाहतूक कोंडी ही महत्त्वाची समस्या आहे. त्यामुळे शहराच्या चारही बाजूला बस स्थानक होणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीट करावी लागेल. पुण्यात पाणी प्रश्न गंभीर आहे. शहरात पाण्याचं नियोजन करणं गरजेचं (lok sabha) आहे. शहराला वेगळं धरण मिळणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पाणी ,ट्रॅफिक, रस्ते यासाठी जाणकार लोकं बसवणं आवश्यक आहे. आपल्या नद्यांचं संवर्धन केलं पाहिजे.

शहरातील सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आहे, याकडे लक्ष द्यावं लागेल. महिलांच्या समस्यासाठी शहरात वेगळं महिला पोलिस आयुक्तालय होणं गरजेचं आहे. शहराची आरोग्य व्यवस्था सक्षम होणं गरजेचं असल्याचं त्यांनी (lok sabha 2024) म्हटलं आहे. पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कृतीक भावनाच काम पूर्ण करणार. शहरात वाचनालय सुरू करणार. पुणे शहरातील स्मारक जपून त्यांना नीट ठेवणं गरजेचं असल्याचं मोरे यांनी म्हटलं आहे. माझा अजेंडा माझ्या डोक्यात आहे, कागदावर नाही असा टोलाही वसंत मोरे यांनी मोहोळ यांना लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse Case: मोठी अपडेट! उदयपूरमधून भावेश भिंडेला अटक

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; भावेश भिंडेला मुंबई पोलिसांनी उदयपूरमधून केली अटक

Malegaon News: क्षुल्लक भांडणावरून ८ वर्षांच्या चिमुकलीची हत्या, आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी महामार्ग रोखला

OTT Released This Week : ‘द नक्सल स्टोरी’ ते ‘मडगांव एक्सप्रेस’, OTT वर मनोरंजनचा धमाका; पाहा लिस्ट

Uddhav Thacekray Dombivli Speech: फडणीवस ते मोदी ठाकरेंनी सगळ्यांनाच धारेवर धरलं

SCROLL FOR NEXT