Sushma Andhare Saam Tv
लोकसभा २०२४

Sushma Andhare: तडस प्रकरणामुळे सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढल्या; राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार

State Election Commission : राजकीय फायदा आणि निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर केल्याप्रकरणी ही तक्रार करण्यात आलीय. सुषमा अंधारे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(सूरज मसूरकर, लातूर)

लातूर: ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुषमा अंधारेंविरोधात राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलीय.(Latest News)

राजकीय फायदा आणि निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर केल्याप्रकरणी ही तक्रार करण्यात आलीय. सुषमा अंधारे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलीय. वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्याविरोधात अंधारेंनी पत्रकार परिषद घेत त्या परिषदेत १७ महिन्यांच्या मुलाला मंचावर आणले होते. त्या प्रकरणी बालहक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार करण्यात आलीय.

काय आहे प्रकरण

नागपूर येथे ठाकरे गटाचे नेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पूजा तडससोबत पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी तडस कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. सुषमा अंधारे यांनी पूजा तडस यांना बाळ घेऊन परिषदेत बसवले होते. त्यावरून अंधारे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय.

दरम्यान पूजा तडस यांनी वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत. लोखंडी रॉडने मारहाण केली, बाळ कुणाचं असं विचारून मला DNA टेस्ट करायला सांगितली. चारित्र्यावर संशय घेतल्याचे आरोप पूजा तडस यांनी केले होते. दरम्यान पंतप्रधान मोदींची रामदास तडस यांच्यासाठी वर्ध्यामध्ये सभा होण्याची शक्यता आहे. यासभेपूर्वी नरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छा आहे, नरेंद्र मोदींनी मला न्याय द्यावा, अशी विनंती पूजा यांनी केली होती.

२०२० मध्ये खासदार रामदास तडस यांच्या मुलावर शारीरिक छळ आणि लैंगिक शोषणाचे आरोप पूजा तडस यांनी केले होते. पूजा तडस यांच्याकडून तडस कुटुंबाविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली होती. लग्नाचं आमिष देऊन पंकज तडस यांनी फसवणूक केल्याचा पूजा तडस यांचा आरोप होता. पूजा तडस यांनी आरोप केल्यानंतर पंकज तडस आणि पूजा यांचं लग्न झालं होतं.

पूजा तडस यांच्या आरोपावर काय म्हणाले पंकज तडस

सुषमा अंधारे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी वर्ध्याचे भाजप उमेदवार रामदास तडस पुत्र पंकज तडस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी काही ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप दाखवल्या. या कथित ऑडिओ क्लिप भास्कर इथापे आणि पूजा तडस यांच्या असल्याचा त्यांनी दावा केला. पत्नीच्या आरोपांनतर पंकज तडस यांनी आजची पत्रकार परिषद सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपचं खंडन करण्यासाठी असल्याचं सांगितलं.हे प्रकरण २०२० मधील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काही लोकांनी काटकरसास्थान करून फसविण्याचा प्रयत्न केला. त्याला ते बळी पडले. यासाठी त्यांनी न्यायालयात दाद मागितल्याचं देखील ते म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dengue : गडचिरोलीत डेंग्यूचा कहर; महिलेसह दोन जणांचा मृत्यू, मुलचेरा तालुक्यात ६६ रुग्ण

Ovarian cancer: अंडाशयाच्या कॅन्सरचं मूळ कारण तज्ज्ञांनी काढलं शोधून; आता गंभीर आजार होण्यापूर्वीच मिळू शकणार उपचार

Mhada Home Price: खुशखबर! म्हाडाच्या घरांच्या किंमती आणखी कमी होणार; सरकारच्या नेमका प्लान काय?

Anger Control Tips: पटकन राग येतो अन् चिडचिड होतेय? ट्राय करा 'हा' उपाय, लगेच मन होईल शांत

Maharashtra Live News Update: नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT