प्रवीण देवळेकर
मुंबई : अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांनी मौन बाळगलंय. बारामतीत आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त महत्त्वाचा असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील केलं होतं. यावरुन पवार निवडणुकीत उभे नसताना पराभवाचा प्रश्न येतोच कुठे,असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता. यावर प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटलांनी काढता पाय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतरही अजितदादा आणि चंद्रकांतदादांमधला संघर्ष अजूनही कायम आहे. शरद पवार यांना बारामतीमधून संपवण्याची भाषा करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवारांनी खडेबोल सुनावलेत.
बारामतीत शरद पवार हे निवडणुकीला उभे नव्हते, मग त्यांचा पराभव करण्याची चंद्रकांत पाटलांची भाषा योग्य नव्हती असं स्पष्ट मत अजित पवारांनी मांडलय. अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत.. तर चंद्रकांत पाटील बारामतीऐवजी पुण्यातच प्रचार करण्याचा दमही भरला. अजित पवारांनी खडेबोल सुनावल्यानंतर चंद्रकांत पाटीलही जशास तसं उत्तर देतील अशी अपेक्षा होती. मात्र अजित पवारांच्या नाराजीनंतर चंद्रकांत पाटलांनी मौन बाळगणं पसंत केलं.. चंद्रकात पाटील पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा थेट ड्रायव्हरला गाडीचा गिअर टाकून निघायला सांगितलं.
अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील संघर्ष तसा जुनाच आहे.. विरोधी पक्षांमध्ये असतानाही अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्ये नेहमीच खटके उडायचे.. मात्र सत्तेत सोबत आल्यानंतरही दोन्ही दादांमधला दुरावा कमी झालेला नाही. तूर्तास चंद्रकांत पाटलांनी मौन बाळगलं असलं तरीही दादा विरुद्ध दादा लढाईचा हा शेवट नक्कीच नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.