India Alliance Seat Sharing Latest News Saam TV
लोकसभा २०२४

MVA Seat Sharing: महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला; कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

Maha Vikas Aghadi Seat Sharing: सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने लोकसभेच्या जागावाटपासाठी दोन फॉर्म्युले निश्चित केले आहेत.

Satish Daud

Maha Vikas Aghadi Seat Sharing Formula in Maharashtra

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे जागावाटपावरून राजकीय पक्षांमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने लोकसभेच्या जागावाटपासाठी दोन फॉर्म्युले निश्चित केले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीचा २०-१५-९-४ असा जागावाटपाचा फॉर्म्युला असेल.

यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला २० जागा, काँग्रेस पक्षाला १५ जागा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला ९ जागा, वंचित बहुजन आघाडीला ४ जागा असणार आहेत. वंचित बहुजन आघाडीला शिवसेना गटाच्या कोट्यातून २, काँग्रेसच्या कोटातून १ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोट्यातून १ जागा देण्यात येईल.

जर वंचितने ४ जागा घेण्यास नकार दिल्यास, २२-१६-१० असा फॉर्म्युला असेल. यामध्ये ठाकरे गटाला २२ जागा, काँग्रेसला १६ जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला १० जागा मिळणार आहे. (Latest Marathi News)

त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येणार, की स्वतंत्र निवडणूक लढवणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी शेतकरी स्वाभिमानी पक्षाला महाविकास आघाडी बाहेरून पाठींबा देणार असल्याची माहिती आहे.

तर सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला, तर रामटेक जालनाची जागा काँग्रेस पक्षाला मिळणार आहे. माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोट्यातून 'रासप'ला सोडण्यात येणार आहे. याशिवाय भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली जाणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ५ दिवसात लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होणार? जानेवारी-फेब्रुवारीच्या हप्ताबाबत मोठी अपडेट

Maharashtra Live News Update: मातंग समाज पुन्हा आक्रमक,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार पडसाद

Ajit Pawar Death : राजीव गांधींची हत्या झाली तशीच अजित पवारांची झाली का? राष्ट्रवादीच्या आमदाराचे ८ सवाल

Success Story: आधी CA, मग IPS, नंतर IAS अधिकारी; माधव अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

Misal Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी झणझणीत मिसळ कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT