Madha Lok Sabha Constituency  Saam TV
लोकसभा २०२४

Madha Lok Sabha: माढा लोकसभेचा तिढा कायम, अफवांवर विश्वास ठेवू नका; रामराजेंचा Whatsapp स्टेटसवरून खुलासा

Madha Lok Sabha Elections: माढा लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला रामराजे निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

Satish Daud

Madha Lok Sabha Constituency

माढा लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला रामराजे निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. यासंदर्भात रामराजे यांनी Whatsapp वर स्टेटस ठेवलं आहे. त्यामुळे माढ्याच्या जागेवरून महायुतीत अद्यापही वाद असून कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचं कळतंय.

माढा लोकसभेसाठी भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोहिते पाटील गटाने नाराजी व्यक्त करत त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इतकंच नाही तर, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुद्धा रणजीत निंबाळकर यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला. त्यामुळे माढ्यात निंबाळकर विरुद्ध निंबाळकर आणि मोहिते पाटील असा सामना रंगला. (Breaking Marathi News)

यावर भाजपचे संकट मोचक म्हणून प्रसिद्ध असणारे नेते गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न देखील केला. रामराजेंची मनधरणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत बैठक घेतली. (Lok Sabha Election 2024)

या बैठकीला रामराजे नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना बोलवण्यात आले होते. सखोल चर्चा केल्यानंतर माढा लोकसभेच्या जागेचा तिढा सुटला अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, बैठकीतून कोणताही मार्ग निघाला नसल्याचे आता समोर येत आहे.

रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या व्हाट्सअप स्टेटसला तशा प्रकारचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने बैठक झाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला युतीधर्म पाळण्याचा शब्द दिला असल्याचं रामराजे यांनी सांगितलं.

परंतु मी माझ्या माढा मतदारसंघातील कार्यकर्ते समविचारी नेते आणि स्थानिक नेते कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून निर्णय घेईन, असंही रामराजेंनी स्पष्ट केलं. याव्यतिरिक्त बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असं स्टेटस रामराजे नाईक निंबाळकर व्हाट्सअपवर ठेवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT