Loksabha Election Exit Poll betting market saam tv
लोकसभा २०२४

Loksabha Election Exit Poll: महाराष्ट्रात महायुती की मविआची सरशी? सट्टाबाजारात कुणाची तेजी?

Loksabha Election Exit Poll : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. त्यापूर्वी सट्टा बाजार तेजीत आहे. विविध जागांचा अन् राज्यातील निकालाचा अंदाज वर्तवला जातोय. काही राज्यातील निकाल धक्कादायक ठरु शकतो. त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश असल्याचं दिसतेय. सट्टाबाजारात कुणाची तेजी? पाहूया एक रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गिरीश निकम, साम प्रतिनिधी

मुंबई : देशभरात 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे. एनडीए विजयाचा गुलाल उधळणार की इंडीया आघाडी बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 4 जून 2024 रोजी निकाल येणार आहेत. त्यापूर्वीच सट्टा बाजारातलं वातावरण गरम झालं आहे. आकड्यांचा खेळ तेजीत आला आहे. सट्टा बाजाराने त्यांचा अंदाज वर्तवला आहे. सर्वात आधी पाहूयात महाराष्ट्रात कुणावर सर्वाधिक सट्टा लागलाय.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने 42 जागा जिंकल्या. यावेळी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार एनडीएला 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीए 14 जागा गमावण्याचा अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केलाय. त्याचवेळी एनडीएच्या जागा कमी झाल्याचा थेट फायदा महाराष्ट्रातील मविआला होणार आहे. बेटिंग मार्केटच्या अंदाजानुसार महाविकास आघाडीला 20 जागा मिळू शकतात.

नागपुरातून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी जिंकतील असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर विजयी होतील. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नुकसान होणार आहे. उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख येथून निवडणूक जिंकतील.

तर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना धक्का बसू शकतो. सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा विजयी होऊन खासदार होतील,असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव होणार असून मविआचे उमेदवार शाहू महाराज विजयी होऊ शकतात, असा अंदाज आहे.

तर देशात एनडीएचीच सत्ता येणार असा अंदाज सट्टा बाजारात वर्तवण्यात येत आहे. मोदींच्याच नावाची सट्टा बाजारात तेजी आहे. मोदी सलग तिस-यांदा पंतप्रधान होणार असा अंदाज वर्तवण्यात येतोय. एनडीएला 350 ते 375 जागा मिळतील असा अंदाज सट्टेबाजांचा आहे. तर काँग्रेसला केवळ 55 ते 70 जागांवर समाधान मानावं लागेल असं सट्टेबाजांना वाटतंय. सट्टे बाजारात एनडीला स्पष्ट बहुमत दिलं असलं जनतेच्या मनात काय हे 4 जूनलाच कळणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फलटण डॉक्टर महिला आत्महत्याप्रकरणी शरद पवार गटाचा मोर्चा

Manoj jarange: सरकारला घोडे लावणार, मनोज जरांगे यांचा घणाघात; पाहा VIDEO

निवडणूक आयोगाचा अजब गजब कारभार! आयुक्तांच्या घरातच १५० मतदारांची नोंद|VIDEO

ASI पोलिसाची धारदार शस्त्राने हत्या, निर्जनस्थळी रक्ताळलेल्या अवस्थेत फेकून दिलं, पोलीस दलात खळबळ

शेतकऱ्यांचा रोष उफाळला! कर्जमाफीच्या मागणीवरून अजित पवारांना काळे झेंडे, पोलिसांचा लाठीचार्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT