Loksabha Election Phase VI Voting: Saamtv
लोकसभा २०२४

Loksabha Election: आठ वेळा मतदान करणारा तरुण अटकेत, बुथवरील सर्व सदस्यांचे निलंबन; पुन्हा मतदान घेण्याचे आदेश

Loksabha Election Phase VI Voting: उत्तरप्रदेशमधील एटामध्ये एका मतदान केंद्रावर तरुणाने आठ वेळा मतदान केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच सपाचे नेते अखिलेश यादव यांनी यासंबंधीचा व्हिडिओ ट्वीट करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

Gangappa Pujari

उत्तरप्रदेशमधील एटामध्ये एका मतदान केंद्रावर तरुणाने आठ वेळा मतदान केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच सपाचे नेते अखिलेश यादव यांनी यासंबंधीचा व्हिडिओ ट्वीट करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित तरुणाला अटक करण्यात आली आहे. तसेच त्या मतदान केंद्रावर पुन्हा फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तरप्रदेशमधील एटा या मतदान केंद्रावर एका तरुणाने 8 वेळा मतदान केल्याचा प्रकार घडला. या तरुणाने त्याचा व्हिडिओ शूट करत समाज माध्यमांवर शेअर केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी तसेच अखिलेश यादव यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एटा जिल्ह्यातील नायगाव पोलीस ठाण्यात एक तक्रार नोंदविण्यात आलीआहे. तसेच ज्याने आठ वेळा मतदान केले त्या तरुणाला अटकही करण्यात आली आहे. राजन सिंग असे या तरुणाचे नाव असून तो खीरियामधील पामरन गावचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित मतदान केंद्रावरील पक्षाच्या सर्व सदस्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे. उर्वरित टप्प्यात या प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT