Sharad Pawar Vs Ajit Pawar 
लोकसभा २०२४

Sharad Pawar Vs Ajit Pawar: काकांची पुतण्याला धोबीपछाड; अजितदादांना दादागिरी भोवली?

Sharad Pawar Vs Ajit Pawar Loksabha : राज्याचं लक्ष लागलेल्या बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्याने काकाने पुतण्याला धोबीपछाड दिल्याची चर्चा रंगलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

राज्याचं लक्ष लागलेल्या बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्याने काकाने पुतण्याला धोबीपछाड दिल्याची चर्चा रंगलीय. त्यातच अजित पवारांनी पाडण्याची धमकी दिल्यानंतरही शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झालेत. त्यामुळे दादांना दादागिरी भोवल्याची चर्चाय. याच दादागिरीवरचा हा खास रिपोर्ट.

केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर सा-या देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीत काका-पुतण्याच्या संघर्षात काकानं पुतण्याचा चितपट केलंय. त्यामुळे बारामतीवर अजूनही शरद पवारांचीच पकड असल्याचं सिद्ध झालंय. कधी निधीच्या नावानं तर कधी विकास कामांच्या नावानं अजित पवारांनी बारामतीकरांकडे मतं मागितली. कचाकचा बटनं दाबा म्हणजे विकासनिधी कमी पडणार नाही असं खुलं विधान अजित पवारांनी जाहीर सभेत केलं होतं.

मात्र विकासासाठी सत्तेची गरज नाही असं सांगत शरद पवारांनी आपल्या खास शैलीत मतदारांना आवाहन करत सुप्रिया सुळेंसाठी मतं मागितली. आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र चर्चा झाली काकांनी पुतण्याचा चारही मुंड्या चीत केल्याची. अजित पवारांनी मात्र बारामतीबाहेर आपली दमबाजी कायम ठेवली

अजितदादांनी अहमदनगरचे शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांना भरलेला हा दम. मात्र त्याच शाळेतल्या विद्यार्थ्यानं थेट हेडमास्तरलाच त्याची जागा दाखवलीय. नगरमध्ये निलेश लंकेंनी तगडं आव्हान असलेल्या भाजपच्या सुजय विखेंना पराभवाची धूळ चारली. पुढे येवढ्यावरच अजित पवार थांबले नाहीत...त्यांनी बारामतीच्या मतदानानंतर शिरूरमध्ये ठाण मांडलं आणि शरद पवारांसोबत गेलेल्या अमोल कोल्हेंनाही असाच दम भरला.

मात्र अमोल कोल्हेंनी अजित पवारांचं आव्हान स्वीकारलं. हाती घड्याळ बांधलेल्या मातब्बर आढळराव पाटलांविरोधात निकराची झुंज दिली. दादांसमोर झुकणार नसल्याचं सांगत कोल्हेंनी विजयश्री खेचून आणली. अजित पवारांनी 2019 च्या लोकसभा प्रचारावेळी विजय शिवतरे यांना चॅलेंज देऊन पराभूत केलं होतं. त्यामुळे स्वपक्षातील आमदारांसोबत विरोधी पक्षातील आमदारांमध्येही अजित पवारांचा दरारा होता. मात्र या लोकसभा निवडणुकीत आपल्या काकांविरोधात शड्डू ठोकलेल्या अजित पवारांनी ज्या उमेदवारांना धमकी दिली होती त्याच मतदारसंघांमध्ये पराभवा पाहावा लागला. त्यामुळे दादांना दादागिरी भोवल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! शहरात गुरूवारी मांस विक्री बंद; राज्यातील 'या' पालिकेचा मोठा निर्णय

Mangalsutra Pendant Designs: पारंपारिक काळ्या मण्यांच्या मंगळसूत्रामध्ये उठून दिसतील हे 5 पेडंट, लेटेस्ट ट्रेडिंग डिझाइन्स पाहा

Maharashtra Live News Update: ठाण्यात वर्गणी देण्यास नकार दिल्यामुळे एका व्यक्तीवर चॉपरने हल्ला

Badshah Wedding : रॅपर 'बादशाह'ची बायको Isha Rikhi आहे तरी कोण?

Latur : जेवणात आढळलं झुरळ, तर पिण्याच्या पाण्यात शेवाळ; लातुरमधील विद्यार्थ्याच्या आरोग्याशी खेळ; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT