Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

Shreya Maskar

हवा महल

राजस्थानमधील जयपूर येथे सुंदर, भव्य हवा महल आहे. ९५३ लहान खिडक्या वापरून याची रचना केली आहे. या खिडक्या लहान 'एअर फनेल्स' प्रमाणे काम करतात.

Hawa Mahal | google

गोलकोंडा किल्ला

तेलंगणामधील हैदराबाद येथे गोलकोंडा किल्ला आहे. अत्यंत जाड ग्रॅनाइटच्या भिंती आणि खोल भूमिगत बोगदे यांची रचना येथे पाहायला मिळते. बोगद्यांमुळे डोंगरावरील थंड वाऱ्याची झुळूक राजवाड्यातील खोल्यांमध्ये नैसर्गिकरित्या खेळती ठेवते.

Golconda Fort | google

जुनागड किल्ला

राजस्थानमधील बिकानेर येथे जुनागड किल्ला आहे. हा किल्ला एकमेकांत गुंतलेल्या लाल वाळूच्या दगडांनी आणि सावली देणाऱ्या जाळ्यांनी बांधलेला आहे. सुंदर, गुंतागुंतीच्या भौमितिक आकाराच्या दगडी जाळ्या प्रखर, डोळे दिपवणारा सूर्यप्रकाश रोखतात, तर खोल्यांमध्ये वारा मुक्तपणे वाहतो.

Junagadh Fort | google

आग्रा किल्ला

उत्तर प्रदेश येथे आग्रा किल्ला आहे. आग्रा किल्ला यमुना नदीच्या अगदी जवळ आहे. तसेच किल्ल्याची दुहेरी थरांच्या पोकळ भिंतींची रचना आहे. नद्यांमुळे थंड वाऱ्याची झुळूक निर्माण होते.

Agra Fort | google

आमेर किल्ला

राजस्थान येथील जयपूर येथे आमेर किल्ला वसलेला आहे. आमेर किल्ल्याच्या खिडक्या 'माओठा सरोवरा'च्या दिशेने आहेत, ज्यामुळे थंड वारे थेट किल्ल्यात येतात.

Amer Fort | google

मेहरानगड किल्ला

राजस्थान येथील जोधपुरला मेहरानगड किल्ला आहे. एका उंच आणि तीव्र उताराच्या कड्यावर किल्ला वसलेला आहे. तसेच खोल तळघर आहे. हा किल्ला खूप उंचावर असल्याने तिथे वेगाने वाहणारे जोरदार वारे येतात.

Mehrangarh Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : इतिहासाच्या पानांमध्ये अजरामर झालेला किल्ला, पावसाळ्यात बनतो ट्रेकिंगचा हॉटस्पॉट

Maharashtra Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...