Shrirang Barane On Parth Pawar Saam TV
लोकसभा २०२४

Shrirang Barne On Parth Pawar: पार्थ पवारांनी माझ्या प्रचाराला यावं, श्रीरंग बारणे यांचे अजित पवार यांच्यासमोर आवाहन

Shrirang Barane On Ajit Pawar: ज्या शिवसेनेच्या उमेदवाराने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता. आज तेच उमेदवार म्हणजे श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांनी माझ्या प्रचाराला यावं असं म्हटले आहे.

गोपाल मोटघरे

Maval Lok Sabha Election 2024:

राज्यासह देशभरामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तोंडावर राजकीय नेत्यांच्या सभा, प्रचार, बैठकांना सुरूवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड येथे आज महायुतीच्या वतीने मावळ लोकसभा क्षेत्र पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये अजित पवार, चंद्रकांत पाटील, उदय सामंत यांच्यासह श्रीरंग बारणे उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांनी माझ्या प्रचाराला यावं, असं आवाहन केले आहे.

ज्या शिवसेनेच्या उमेदवाराने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता. आज तेच उमेदवार म्हणजे श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांनी माझ्या प्रचाराला यावं असं म्हटले आहे. या बैठकीवेळी श्रीरंग बारणे यांनी 2019 च्या निवडणुकीचा दाखला अजित पवार यांच्यासमोर दिला. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी निवडून येणार हे ठामपणे सांगितले होते आणि मी खासदार झालो., असे त्यांनी यावेळी सांगितले.

यंदा मावळ लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे हे मावळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत पार्थ पवार यांनी महायुती धर्म पाळत माझ्या प्रचाराला यावं, असं आवाहन श्रीरंग अप्पा बारणे यांनी केला आहे. तसंच, 'अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मावळ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा धर्म निभावत माझा प्रचार करणार असं आश्वासन मला स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी उमेदवारी जाहीर होताच फोन करून दिलं होतं. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत माझा प्रचार करण्यासाठी पार्थ पवार यांनी देखील यावं.', असं आवाहन श्रीरंग बारणे यांनी केले आहे.

दरम्यान, मागच्या वेळीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळ लोकसभा मतदार संघातून उभे राहिले होते. पार्थ पवार यांच्याविरोधात शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे उभे होते. ही निवडणूक अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. पण श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता आणि आता तेच विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे महायुतीचे मावळचे उमेदवार आहेत. त्यामुळे अजित पवार हे श्रीरंग बारणेंच्या प्रचाराला हजेरी लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Crime: मेहुण्याच्या प्रेमात झाली वेडी, जगात येण्यापूर्वीच बाळाला संपवलं अन् कचऱ्यात फेकलं

Marathi Vijay Melava: ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी वरळी डोमबाहेर मराठी जनसागर|VIDEO

SCROLL FOR NEXT