Amol Kolhe On Ajit pawar Saam Tv
लोकसभा २०२४

Amol Kolhe: बारामतीत रंगला 'तुतारी'चा वाद! पराभव दिसत असल्यानेच महायुतीकडून रडीचा डाव; अमोल कोल्हेंचा घणाघात

Baramati Loksabha Election 2024: सोहेल शेख या अपक्ष उमेदवारालाही तुतारी चिन्ह दिल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेतला आहे. यावरुनच शिरुर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

रोहिदास गाडगेखेड

पुणे|ता. २३ एप्रिल २०२४

बारामती लोकसभा मतदार संघामध्ये तुतारी चिन्हावरुन नवा वाद उभा राहिला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या 'तुतारी वाजवणारा माणूस' चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. अशातच सोहेल शेख या अपक्ष उमेदवारालाही तुतारी चिन्ह दिल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेतला आहे. यावरुनच शिरुर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात यांच्याविरोधात शरद पवार नावाचे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. तसेच सोहेल शेख यांना तुतारी चिन्ह देण्यात आले आहे. यावरुन सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघात घेरण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. यावर बोलताना अमोल कोल्हे यांनी अजित पवारांसह महायुतीवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

"महायुतीचे मी आभार मानतो, कारण त्यांनी आपला पराभव स्विकारला आहे. पराभव समोर दिसत असल्याने अशाप्रकारे रडीचे डाव खेळले जात आहेत का? असा प्रश्न मनात येईल. परंतु बारामतीचा मतदार सुज्ञ आहे. त्यामुळे ते तुतारी वाजवणारा माणूस याच चिन्हावर मत देतील, ज्यांना स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास असतो, त्यांना अशा कुबड्या घेण्याची गरज पडत नाही," असा टोला अमोल कोल्हेंनी लगावला आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडून घेण्यात आलेला आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. तुतारी चिन्ह आणि तुतारी वाजवणारा माणूस हे दोन वेगवेगळे चिन्ह असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे बारामतीतले अपक्ष उमेदवार सोयल शहा युनुस शहा शेख यांना तुतारी चिन्ह मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघड

Rinku Rajguru: हातात टाळ, डोक्यावर तुळस, विठुरायाच्या भक्तीत दंगली रिंकू राजगुरू

ठाकरे बंधू फक्त ५ तारखेपर्यंतच एकत्र? राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्यानं सांगितली पुढची रणनीती| VIDEO

Pakistani Celebrities Banned in India: भारताने 'या' पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंटवर २४ तासांत पुन्हा घातली बंदी

Leftover Rice: शिळा भात खाल्ल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात?

SCROLL FOR NEXT