Mumbai NEws  Saam TV
लोकसभा २०२४

South Mumbai Lok Sabha : दक्षिण मुंबई मतदारसंघात महायुतीचा नवा डाव; मिलिंद देवरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, मनसे फॅक्टर महत्त्वाचा

Loksabha Election 2024 : सध्या मिलिंद देवरा शिंदे गटातून राज्यसभेवर खासदार आहेत. मुंबई उत्तर मध्यच्या बदल्यात मुंबई दक्षिण मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे.

प्रविण वाकचौरे

Lok Sabha Election 2024 :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. जागावाटपावरुन महायुतीत रस्सीखेच सुरुच आहे. मुंबईतील दक्षिण मुंबईच्या जागेवरुनही शिवसंना आणि भाजपमध्ये तिढा कायम आहे. दक्षिण मुंबईतून निवडणुक कोण लढवणार यासाठी अनेक नावे समोर येत आहे.

मात्र आता मुंबई दक्षिणमधून महायुती मिलिंद देवरा यांना मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मिलिंद देवरा शिंदे गटातून राज्यसभेवर खासदार आहेत. मुंबई उत्तर मध्यच्या बदल्यात मुंबई दक्षिण मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील अनेक दिवसांपासून मनसे महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. त्यामुळे मनसे महायुतीत आल्यास बाळा नांदगावकर यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं.

मिलिंद देवरा यांची राज्यसभेची जागा मनसे महायुतीत आल्यास बाळा नांदगावकरांना देण्याची मनसेला ऑफर आहे. मुंबई दक्षिणमधून भाजपचे राहुल नार्वेकर यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. मात्र अशावेळी त्यांना ऐनवेळी माघार घ्यावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Sayaji Shinde: कुंभमेळ्यासाठी झाडे तोडल्याने सयाजी शिंदे संतापले; सरकारला खडेबोल सुनावाले, म्हणाले आवाज उठवला तर....

ऐन निवडणुकीत Kidnapping? राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला उमेदवार अन् पतीला डांबून ठेवलं, 'असा' लागला सुगावा

Palghar Winter Tourism: एका दिवसाच्या सुट्टीत लोणावळा-खंडाळ्याचा फील घ्यायचाय? मग हे Hidden Spots ठरतील बेस्ट

Leopard Attack : धक्कादायक! सरपणासाठी गेल्या परत आल्याचं नाहीत, बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT