Nashik Constituency News:  Saamtv
लोकसभा २०२४

Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत नवा ट्वीस्ट! महंत अनिकेत शास्त्रीही निवडणुकीच्या रिंगणात; भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याचा दावा

Nashik Constituency News: महंत अनिकेत शास्त्रीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे भाजप नेत्यांनीच अर्ज भरण्याच्या सुचना दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक, ता. २७ एप्रिल २०२४

नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत तिढा अद्याप कायम आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशातच नाशिक लोकसभेत आणखी एक नवा ट्विस्ट समोर आला असून महंत अनिकेत शास्त्रीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे भाजप नेत्यांनीच अर्ज भरण्याच्या सुचना दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

एकीकडे नाशिकच्या जागेवरुन महायुतीत पेच कायम असतानाच शांतीगिरी महाराजांनंतर आणखी एक आध्यात्मिक गुरू नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महंत अनिकेत शास्त्री यांनीही नाशिक मतदार संघावर दावा केला असून माझ्याच उमेदवारीची घोषणा होईल, असेही ते म्हणालेत.

"मी भाजपकडूनच निवडणूक लढवत आहे. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यासह केंद्रातील वरिष्ठ भाजप नेत्यांनी मला अर्ज भरण्यास सांगितलं आहे. कोणत्याही क्षणी माझी उमेदवारी घोषित होईल, असे अनिकेत शास्त्री यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार?" हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नाशिक लोकसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. एकीकडे शिंदे गटाचे हेमंत गोडसे, अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा असतानाच नवी दोन नावे समोर आली आहेत. यामध्ये माजी खासदार देविदास पिंगळे आणि सिन्नरचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sawan 2025 Upay: उत्तरेतील श्रावणाचा आज पहिला दिवस; 'हे' उपाय करा भगवान शंकर होतील प्रसन्न

Maharashtra Live News Update : पंढरपूर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

Rose : जाणून घ्या गुलाबाचे फूल खाण्याचे ५ फायदे

Hirvi Mirchi Thecha: अस्सल गावरान पद्धतीचा हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा?

Shocking News : मुलीच्या शाळेची फी आणि TC मागायला गेले, संस्थाचालकांकडून बेदम मारहाण; वडिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT