Sanjay Raut And Narendra Modi
Sanjay Raut And Narendra ModiSaam TV

Sanjay Raut : कोल्हापूरच्या गादीपुढे मोदी कोणीही नाहीत; संजय राऊतांची घणाघाती टीका

Kolhapur Lok Sabha Constituency : जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही, असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं आहे.

मयुर राणे, मुंबई

कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रात मोदींनी तंबू ठोकला आहे. लवकरच ते मुंबईत देखील सभा घेणार आहेत. छत्रपती शाहू महाराजांचा पराभव व्हावा यासाठी मोदी येत आहेत हे महाराष्ट्र कायम लक्षात ठेवेल, अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut And Narendra Modi
Kolhapur Constituency: एमआयएमचा पाठिंबा शाहू महाराजांना अडचणीचा ठरेल : राजेश क्षीरसागर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा पार पडणार आहे. कोल्हापूरच्या तपोवन या मैदानावर आज सायंकाळी ५ वाजता ही सभा पार पडणारे. या सभेवरून संजय राऊतांवर जोरदार टीका करत थेट छत्रपती शाहू महाराजांचा पराभव व्हावा यासाठी मोदी येत असल्याचं वक्तव्य केलं आहे.

शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगामी विचार दिले. जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही, असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं आहे.

भाजपने कोल्हापुरात उमेदवार जाहीर करणंच चुकीच आहे. छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावं ही आमची भूमिका होती. कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती तरी छत्रपती शाहू महाराजांसाठी आम्ही ती जागा सोडली आणि भाजप, नरेंद्र मोदी हे छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्रातली जनता हे कधीच विसरणार नाही, असं मत राऊतांनी यावेळी व्यक्त केलं.

गादी पुढे मोदी कोणीही नाहीत. कोल्हापूरची गादी, म्हणजे मोदींची गादी नाही. भाजपा त्या गादीचा अपमान करत आहे. आम्हाला अपेक्षित होतं मोदी छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रात येतात, अशा शब्दांत राऊतांनी मोदींवर टीका केलीये.

जय भवानी जय शिवाजी ही घोषणा त्या गादीची आहे शिवाजी महाराजांचा सन्मान करणारी ही प्रेरणादायी घोषणा आम्ही देतो. महाराष्ट्राची ती कुलदैवत आहे त्यावर तुम्ही आघात करत आहात. शिवाजी महाराजांच्या गादीच्याविरोधात तुम्ही प्रचाराला आले आहात, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय.

Sanjay Raut And Narendra Modi
Jalna Crime News : महिलांच्या शरीराला झाडूने स्पर्श करून उपचार; जालन्यातील भोंदू बाबाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com