ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ट्रेकिंग ही एक रोमांचक गोष्ट आहे जी तुम्हाला निसर्गाच्या जवळ नेते परंतु ट्रेकिंगला जाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.त्या कोणत्या ते जाणून घ्या.
ट्रेकिंगला जाण्याआधी प्लानिंग आणि तयारी दोन्ही असणे अत्यंत आवश्यक आहे.
तुमच्या फिटनेस लेव्हलचे मुल्यांकन करा आणि त्यानुसार ट्रेकिंगला जायचे की नाही ते ठरवा आणि चढता येईल असा सोपा ट्रॅक निवडा.
ट्रेकिंग बूट, बॅकपॅक आणि पाण्याची बॉटल, मेडिसीन बॉक्स आणि लागणारे आवश्यक साहित्य ट्रेकिंगला जाताना तुमच्या सोबत ठेवा.
जीथे ट्रेकिंगला जाणार असाल तेथील हवामानाचा अंदाज घ्यावा. त्यानुसार कपडे घालावे आणि सोबत अन्य कपडेसुध्दा जवळ ठेवावे.
ट्रेकिंगला जाताना एक मॅप तयार करा. जर तुम्हाला काही ट्रॅक बद्दल काही माहिती नसेस तर स्ठानिक लोकांची मदत घ्या आणि ट्रेकिंग बद्दलची माहिती मिळवा.
ट्रेकिंग चढून वर गेल्यावर जर तुम्हाला खाली बघायची भीती वाटत असेल तर खाली बघू नये. तसेच पर्यावरणाचा आदर करावा, कचरा टाकू नये.