Mismatch Jewelry With Saree : साडीवर ट्राय करा या मिसमॅच ज्वेलरी, तुम्हीही दिसाल ट्रेंडी आणि स्टायलिश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मिसमॅच ज्वेलरी ट्रेंड काय आहे?

आता साडीच्या रंगाशी जुळणारीच ज्वेलरी घालायची गरज नाही. वेगळ्या रंगाची ज्वेलरी घालून साडीला हटके आणि स्टायलिश टच देणे म्हणजे मिसमॅच ज्वेलरी ट्रेंड.

Saree & Jewellery | GOOGLE

पिवळ्या साडीवर हिरवी ज्वेलरी

पिवळ्या साडीवर हिरव्या रंगाची ज्वेलरी खूप फ्रेश आणि आकर्षक दिसते. हा कॉम्बिनेशन सण समारंभांसाठी खूप शुभ मानला जातो.

Saree & Jewellery | GOOGLE

लाल साडी आणि हिरवी ज्वेलरी

लाल साडीवर हिरव्या स्टोनची किंवा ऑक्सिडाइज्ड हिरवी ज्वेलरी खूप रॉयल दिसते. हा लुक सण आणि रिसेप्शनसाठी योग्य आहे.

Saree & Jewellery | GOOGLE

निळी साडी आणि पिवळी ज्वेलरी

निळ्या साडीवर पिवळ्या मण्यांची किंवा मस्टर्ड शेडची ज्वेलरी घाला. फ्रेश आणि मॉडर्न टच देते.

Saree & Jewellery | GOOGLE

गुलाबी साडी आणि हिरवी ज्वेलरी

गुलाबी साडीवर एमराल्ड हिरवी ज्वेलरी फारच एलिगंट दिसते. लग्नसमारंभासाठी हा क्लासिक मिसमॅच लुक आहे.

Saree & Jewellery | GOOGLE

जांभळी साडी आणि सोनेरी ज्वेलरी

जांभळ्या साडीवर जाड सोनेरी ज्वेलरी किंवा कुंदन सेट घातल्यास लुक रिच आणि पारंपरिक वाटतो.

Saree & Jewellery | GOOGLE

पांढरी साडी आणि लाल ज्वेलरी

पांढऱ्या साडीवर लाल स्टोनची किंवा टेम्पल ज्वेलरी सण-पूजा आणि पारंपरिक कार्यक्रमांसाठी परफेक्ट आहे.

Saree & Jewellery | GOOGLE

काळी साडी आणि मल्टीकलर ज्वेलरी

काळ्या साडीवर मल्टीकलर मण्यांची ज्वेलरी घालावी. लुकला बोल्ड आणि फॅशन-फॉरवर्ड बनवते.

Saree & Jewellery | GOOGLE

स्टाइलिंग गोल्डन टिप

मिसमॅच ज्वेलरी करताना एकच दागिना फोकस ठेवा नेकलेस किंवा कानातले आणि उरलेले अ‍ॅक्सेसरीज साधे ठेवा. असे केल्यास लूक चांगला दिसतो.

Saree & Jewellery | GOOGLE

NEXT : Blouse Back Designs: ट्रेंडी आणि यूनिक बँक ब्लाउज डिझाईनसाठी 'हे' पॅटर्न नक्की ट्राय करा

Blouse Back Designs | Saam Tv
येथे क्लिक करा