Sanjay Raut Saam Tv
लोकसभा २०२४

Sanjay Raut: ब्रेंकिंग! PM मोदींबाबत वादग्रस्त विधान, संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल; भाजप नेत्यांकडून अटकेची मागणी

Maharashtra Loksabha Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेत संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Gangappa Pujari

मुंबई|ता. ९ मे २०२४

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेत संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या अटकेचीही मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन संजय राऊत यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रमोद राठोड यांनी दिली आहे.

संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे पुन्हा दिसून आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल संजय राऊत यांनी निंदनीय व्यक्त केले आहे. याविरोधात कुंडलिंक नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच याप्रकरणी निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल करणार आहे. या वाचाळ व्यक्तीला लगाम घालण्याची विनंती करणार आहोत, असे भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रमोद राठोड यांनी म्हटले आहे.

बीडमध्येही तक्रार दाखल..

दरम्यान, संजय राऊत यांनी अहमदनगर येथे नरेंद्र मोदी यांच्याविषयी गाडून टाकू असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता या वक्तव्याविरोधात भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी बीडच्या पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी नगरच्या जाहीर सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, महाराष्ट्राच्या मातीत गाडू..अशा प्रकारचे वक्तव्य करून सामाजिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राम कुलकर्णी यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

LDL cholesterol: निरोगी व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती? ही रेंज माहित आहे का?

Dark elbows causes: कोपर काळं पडतंय? धूळ-मळ समजून दुर्लक्ष करू नका, शरीरातील ‘या’ गंभीर समस्येचा असू शकतो संकेत

SCROLL FOR NEXT