Maha Vikas Aghadi Seat Allocation  Saam Digital
लोकसभा २०२४

MVA Seat Sharing: ठाकरे गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे 'मविआ'चं जागावाटप रखडलं? चेंडू काँग्रेस हायकमांडच्या कोर्टात!

Lok Sabha Election 2024: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील जागावाटप रखडल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट २२ जागा लढवण्यावर ठाम असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Satish Daud

Maha Vikas Aghadi Seat Sharing

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील जागावाटप रखडल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट २२ जागा लढवण्यावर ठाम असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते हैराण झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जागावाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या महाराष्ट्रातील काही नेत्यांनी ठाकरे गटाच्या आक्रमकपणाची तक्रार थेट दिल्ली हायकमांकडे केल्याची माहिती आहे. (Breaking Marathi News)

त्यामुळे महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा काँग्रेस हायकमांडच्या मध्यस्थीने सोडवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लोकसभेच्या २२ जागांवर निवडणूक लढवली होती. यातील तब्बल १८ जागांवर त्यांचे खासदार निवडून आले होते.

मात्र, शिवसेनेतील अभुतपूर्व फुटीनंतर यातील १४ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले. त्यामुळे या खासदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा मैदानात उतरले आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही ठाकरे गट २२ जागा लढवण्यावर ठाम आहे.

ठाकरे गट सध्या महायुतीत सहभागी असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत त्यांची जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीतील दोन्ही पक्षातील नेते नाराज असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. जागावाटपाचा तिढा आता काँग्रेस हायकमांडच्या मध्यस्थीने सोडवला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT