Prakash Ambedkar On PM Narendra Modi
Prakash Ambedkar On PM Narendra Modi Saam TV
लोकसभा २०२४

Prakash Ambedkar: मोदींनी काँग्रेसलाच नाही तर भाजपलाही संपवलं; प्रकाश आंबेडकर यांची टीका

Satish Daud-Patil

Prakash Ambedkar on Narendra Modi

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नरेंद्र मोदी केवळ काँग्रेसलाच नव्हे, तर स्वतः च्या भाजपा पक्षाला देखील संपवायला निघाले आहेत, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे शुक्रवारी (ता. १२) भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी वंचितचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय केवट यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेतून प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) सुरुवातीपासून काँग्रेसला संपवण्याची भाषा बोलत होते. मात्र नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला नाही तर स्वतः च्या भाजपा पक्षाला संपवलेला आहे. आज भाजपापेक्षा मोदी मोठे झालेले आहेत. खुद्द देवेंद्र फडणवीस त्यांच्या भाषणातून भाजपाला मजबूत करण्यासाठी मत मागत नाही तर मोदींना मजबूत करण्यासाठी मत मागताना दिसत आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

भाजपने गुंड प्रवृत्तीने लोकांना धमक्या देऊन निवडणूक रोख्यांमधून कोट्यवधी रुपये कमावले, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. जिल्ह्यात धंदेवाल्यांकडून धमक्या देऊन वसुली करणारे गुंड असतात. आपण अशा गुंडांना मतदान करून निवडून आणत नाहीत, तर मग निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून अब्जावधी रुपये कमावणाऱ्या चोरांना कसे मतदान करणार, असा सवाल देखील आंबेडकर यांनी विचारला.

प्रकाश आंबेडकर यांनी मोदींच्या गॅरंटीची देखील चांगलीच पोलखोल केली. भारत हा हिंदुत्ववादी राष्ट्र बनवू असे सांगणाऱ्या मोदींच्या १० वर्षाच्या कार्यकाळात तब्बल १७ लाख कुटुंबांनी भारताची नागरिकता सोडून पलायन केलेले आहे. जर पुढचे ५ वर्ष अजून यांच्या हातात सत्ता दिली, तर २० लाखांहून अधिक कुटुंब देश सोडून जातील, असा टोला आंबेडकर यांनी मोदींना लगावला.

जर तुम्ही भाजपालाच मतदान करत असाल, तर हा देश राम भरोसे आहे. त्यामुळे मतदारांनो जागे व्हा जागृत व्हा सतर्क व्हा. एवढी माहिती दिल्यानंतरही जर तुम्ही भाजपालाच मतदान करत असाल, तर हा देश राम भरोसे आहे असेच म्हणावे लागेल, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crop Loan : वर्धा जिल्ह्यात पीक कर्जासाठी बँकांना ११०० कोटींचे उद्दिष्ट; १० टक्के कर्ज वितरित

Soni Razdan News : आलिया भट्टच्या आईसोबत झाला मोठा स्कॅम, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिला महत्वाचा सल्ला

Rohit Pawar News: 'मतदानाचा परळी पॅटर्न', बीडमध्ये बुथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; VIDEO

Constable Vishal Patil Death Case: विशाल पवार मृत्यू प्रकरणात, शवविच्छेदनातून चक्रावून टाकणारी माहिती उघड

Benifits of Fruit Peel: फळांच्या सालीचे त्वचेसाठी जबरदस्त फायदे; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT