Chandrakant Khaire saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 : 'माझी ही शेवटीची निवडणूक असेल...', उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत खैरे भावुक

Chattrapati Sambhajinagar Loksabha Election : उद्धव ठाकरे यांचे धन्यवाद मानतो आणि येणाऱ्या निवडणुकीत जिंकून येईल असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.

साम टिव्ही ब्युरो

Chattrapati Sambhajinagar :

लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना सहाव्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत खैरे भावुक झाल्याचं पहायला मिळालं.

शिवसेना पक्षाशी आणि उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यामुळेच आपल्याला उमेदवारी मिळाली असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले. शिवाय आपली ही शेवटची निवडणूक असून आपण जिंकून येणारच, असा विश्वासही चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल चंद्रकांत खैरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांचे धन्यवाद मानतो आणि येणाऱ्या निवडणुकीत जिंकून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तिकिटासाठी थोडा संघर्ष करावा लागला हे सुद्धा त्यांनी मान्य केलं. त्यामुळे यावेळी ते थोडे भावनिक सुद्धा झाले. (Lok Sabha Election 2024)

मात्र, आता तिकीट मिळाल्यानंतर अंबादास दानवेही विरोधात काम करणार नाही, ही शिवसेनेची पद्धत आहे. तिकीट मिळाल्यावर सगळे जोमाने काम करतात तसे जोमाने काम करू. आम्ही निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अंबादास दानवे काय म्हणाले?

मी नाराज नाही. पक्षाचं हित मला कळलं. सर्वांची मते जाणून घेऊन ही यादी करण्यात आली आहे. मी 2014, 2019 मध्ये इच्छुक होतो तशी आताही इच्छा होती. इच्छा असणे चूक नाही. मात्र माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची महत्वाची जबाबदारी दिली आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.

आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे. निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुखांचा आहे. व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचे हीत महत्वाचं आहे. पक्षप्रमुख आणि पक्ष जी जबाबदारी देतील ती सर्व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे, असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा OUT; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल भारताची Playing XI

Dhananjay Munde vs Manoj Jarange: धनंजय मुंडेंचा जरांगेंना विरोध की अस्तित्वाचा संघर्ष?

Prem Birhade News : पुण्याच्या कॉलेजचा 'मॉडर्न' जातीयवाद? तरुणाला गमवावी लागली लंडनमधील नोकरी, VIDEO

SCROLL FOR NEXT