Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात ५९.६३ टक्के मतदान; या जिल्ह्यात झालं सर्वाधिक मतदान

Sandeep Gawade

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ जागांवर सायंकाळी ६ वाजता मतदान संपलं. या आठ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या एकूण 204 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. 4 जूनला निकाल लागणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५९.६३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी

बुलढाणा - ५८.४५ टक्के

अकोला - ५८.०९ टक्के

अमरावती - ६०.७४ टक्के

वर्धा - ६२.६५ टक्के

यवतमाळ - वाशिम - ५७.०० टक्के.

हिंगोली - ६०.७९ टक्के

नांदेड - ५९.५७ टक्के

परभणी - ६०.०९ टक्के

परभणी लोकसभा मतदारसंघात अंदाजे एकुण 60.09 टक्के मतदान

परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दूसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदार संघासाठी आज रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. परभणी लोकसभा मतदार संघात अंदाजे सरासरी एकूण अंदाजे 60.09 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील 2 हजार 290 मतदान केंद्रातून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Namaskar Benefits : सूर्यनमस्कार करण्याचे फायदे जाणून घ्या

Washim Railway : शकुंतला रेल्वेचा ट्रॅकच गेला चोरीला, घटनेने खळबळ; नेमकं काय आहे प्रकरण?

Cow Bike Riding Video: सगळं काही शक्य! गायीने केली बाईक रायडिंग, VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

PM मोदींनी चार टप्प्यांत 270 चा जागांचा टप्पा ओलांडला, अमित शहा यांचा दावा

Eggs : उकडलेली अंडी किती दिवस टिकतात?

SCROLL FOR NEXT