Akola Lok Sabha: आधी मतदान, नंतरच वडिलांवर अंत्यसंस्कार! दुःख पोटात ठेवत कुटुंबियांनी बजावला मतदानाचा अधिकार

Lok Sabha Election 2024: मनात दुःख, डोळ्यात आसवं, असं काहिस चित्र अकोल्यात पाहायला मिळालं. घरात ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला, तरी कुटुंबातील सर्व जणांनी मतदान केंद्रावर दाखल होत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
Akola Lok Sabha
Akola Lok SabhaSaam Tv

Akola Lok Sabha:

>> अक्षय गवळी

मनात दुःख, डोळ्यात आसवं, असं काहिस चित्र अकोल्यात पाहायला मिळालं. घरात ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला, तरी कुटुंबातील सर्व जणांनी मतदान केंद्रावर दाखल होत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. हा प्रकार अकोला शहरातल्या न्यू तापडियानगर येथील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यू तापडियानगर इथं पिल्लै कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ति रांचचंद्र दुर्गय्या पिल्लै यांचं आज 26 एप्रिल रोजी सकाळी वयाच्या 88 व्या वर्षी दुःखद निधन झाले. असे असताना कुटुंबियांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. घरात वडिलांचा पार्थिव, त्यात दुसरीकडे मतदानाचं कर्तव्य होतं.

Akola Lok Sabha
Amol Kolhe : अमोल कोल्हेंच्या उमेदवारी अर्जावर आधी आक्षेप, नंतर अर्ज ठरला वैध; नेमकं काय घडलं?

अशा दुःखद परिस्थितीत दिनेश पिल्लै यांनी आधी मतदान करण्याचा आणि नंतर वडिलांवर अंत्यसंस्कार, असा निश्चय केला. त्यानंतर दिनेश पिल्लैसह कुटुंबातील सर्वांनी राष्ट्रीय कर्तव्य बजावलं. इतक्या दुःखाच्या क्षणातही त्यांनी मतदान केंद्र गाठत आपलं मतदान केलं. अशा प्रकारे दिनेश पिल्लै यांनी आदर्श घडवला असून सर्वत्र त्यांचं कौतूक होतंय.

अकोला लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरुवात झालीये. आपलं मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दिव्यांग ज्येष्ठ नागरिक या सोबतच लग्नपूर्वी नवरदेव नवरी असे अनेक प्रसंग आपल्याला मतदान करताना दिसून आले. दरम्यान अकोला मतदार संघात जवळपास 2 हजार 56 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. यंदा अकोला लोकसभा मतदार संघात ऐकून 18 लाख 75 हजार 637 एवढे मतदार आहे.

Akola Lok Sabha
Maharashtra Politics: सरकार वाचवण्यासाठी आणखी काही लोकांना तुरुंगात टाकणार होते, मुख्यमंत्री शिंदेंचा आणखी एक गौप्यस्फोट

अकोला लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा निहाय मतांची टक्केवारी

  • अकोला पूर्व- 49.10 टक्के.

  • अकोला पश्चिम- 47.38 टक्के.

  • अकोट - 52.30 टक्के.

  • बाळापुर : 56.36 टक्के.

  • मूर्तिजापुर- 56.93 टक्के.

  • रिसोड- 53.80 टक्के.

एकत्रित अकोला लोकसभा मतदारसंघातील मतांची टक्केवारी - 52.49 टक्के एवढं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com