Cricticized PM Modi From Saamana Editorial
Cricticized PM Modi From Saamana Editorial Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: 'मोदींची हवा नाहीच' अमरावतीच्या ताई-बाईंनी खरेच सांगितले; 'सामना'मधून PM मोदींवर हल्लाबोल

Rohini Gudaghe

सामना वृत्तपत्र ठाकरे गटाचे मुखपत्र म्हणून ओळखलं जातं. ठाकरे गटाचे मुखपत्र सामनामधून पंतप्रधान मोदींवर निशाणा (Cricticized PM Modi From Saamana Editorial) साधण्यात आला आहे. भाजपचे सर्वच मुखवटे गळून पडले, तरी ‘सर्व्हे’ची हवा का? असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून विचारला गेला आहे. काल नवनीत राणा यांनी 'मोदींची हवा, या फुग्यात कोणी राहू नये;' असं वक्तव्य केलं होतं.

'मोदींची हवा नाहीच' अमरावतीच्या ताई-बाईंनी खरेच सांगितले, असा हल्लाबोल 'सामना'मधून पंतप्रधान मोदींवर केला गेला आहे. ही निवडणूक मोदी आणि त्यांच्या लोकांच्या हातात राहिलेली नसून जनतेने हातात (Saamana Editorial) घेतली आहे. गुजरात, राजस्थान वगैरे भागात राजपूत समाज मोदींच्या विरोधात आहे. परंतु राजपुतांचे मोदींविरोधी उग्र आंदोलन समोर आलेले आहे.

बोगस मीडिया सर्व्हे करून मोदी विजयी होत असल्याचं सांगतं आहे. अशा बोगस सर्व्हेची हवा का केली जातेय, असा सवाल देखील सामनामधून विचारला गेला आहे. भाजपचे सर्व मुखवटे गळून (Cricticized PM Modi) पडले आहेत. खासदार नवनीत राणा यांचं बोलणं वागणं खोटं आहे. त्यांचं हसणं, रडणं, प्रमाणपत्र आणि हिंदुत्व प्रेम देखील खोटं आहे, परंतु त्यांनी काल एक जळजळीत सत्य आपल्याला सांगितल्यांचं सामनामध्ये (lok sabha) सांगितलं आहे.

लोकांना भ्रमात ठेवून मूर्ख बनवून निवडणुका लढविणे हे हवा असल्याचं लक्षण नाही, असं सामनामध्ये म्हटलं आहे. असत्य आणि अर्धमच्या हवेवर मोदींचा विजय असतो. देवेंद्र फडणवीस म्हणाले (Saamana Editorial Maharashtra Politics) राज्यात, ४५ पेक्षा जास्त जागा जिंकू यावरून देखील त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. त्यांना संपूर्ण देशामध्ये ४५ पेक्षा जास्त जागा जिंकू, असं म्हणायचं असेल अशी टीका फडणवीसांवर उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

भाजपवाले हवा तो आकडा सांगत आहे. सर्व्हेच्या माध्यमातून दिशाभूल करत आहेत. काही कंपन्यांना हाताशी धरून हवे ते आकडे सर्व्हेच्या माध्यमातून सांगितले जात आहेत. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न (Maharashtra Politics) असल्याचा आरोप सामनामधून केला गेला आहे. शिवसेनेला मुंबईमध्ये एकही जागा मिळणार नाही, असं भाजपने म्हटलं आहे. मग मुंबईमधील सर्व जागा बिनविरोध महायुतीला मिळणार का? असा सवाल देखील सामनामधून केला गेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FD Investment Tips: एक नंबर! तुमच्या गुंतवणुकीवर 'या ५ बँका देतील ९.६० टक्के व्याज

Satara Peacock Viral : माणसाळलेला मोर बघा! बिनधास्त पिसारा फुलवून पर्यटकांच्या घोळक्यात नाचतोय, मोबाइल कॅमेऱ्यासमोरही देतो पोझ, Video

Jos Buttler,ENG vs PAK: टी-२० वर्ल्डकपआधी इंग्लंडला मोठा धक्का! महत्वाच्या मालिकेतून जोस बटलर बाहेर

Sambhajinagar HSC Topper | पोरी जिंकलंस, संभाजीनगरच्या तनिषाने बारावीत मिळवले 100 टक्के गुण

Pune Porsche Car Accident: कोझी बार आणि ब्लॅक पब सील, राज्य शुल्क विभागाची कारवाई; बार मालकांना ४ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT