kiran samant challenges vaibhav naik lok sabha election 2024 ratnagiri
kiran samant challenges vaibhav naik lok sabha election 2024 ratnagiri saam tv
लोकसभा २०२४

Konkan Politics: वैभव नाईकांचा पन्नास हजार मताधिक्यांनी पराभव अटळ,निलेश राणेंना निवडून आणणार : किरण सामंत

Siddharth Latkar

Ratnagiri Sindhudurg Constituency :

रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघ शिवसेनेलाच द्यावा अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री तसेच मंत्री नारायण राणे यांच्याकडे करावी असे शिवसेना नेते किरण सामंत यांनी उद्याेग मंत्री बंधू उदय सामंत (uday samant) यांच्याकडे केली. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) यांचा पन्नास हजार मताधिक्यांनी पराभव करून निलेश राणेंना निवडून आणू अशी नाईक यांच्या टीकेला किरण सामंत (kiran samant) यांनी उत्तर दिले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण तापलं आहे. भाजपच्या मेळाव्यानंतर आज शिवसेनेने रत्नागिरीत मेळावा घेत या मतदारसंघावर दावा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी यासाठी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यांपर्यंत पोहोचवणे हा मेळाव्याचा उद्देश हाेता. आजचा मेळावा हा शक्तिप्रदर्शन नव्हते असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान नारायण राणेंनी दम दिल्याने किरण सामंत यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतल्याचा दावा आमदार वैभव नाईक यांनी केला हाेता. त्यास आज किरण सामंत यांनी मेळाव्यात प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांचा पन्नास हजार मताधिक्यांनी पराभव करून निलेश राणेंना निवडून आणू. महायुतीचा मुख्यमंत्री पुन्हा होण्यासाठी ताकदीने प्रयत्न करणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruturaj Gaikwad Statement: चेन्नईचं नेमकं चुकलं तरी कुठं? कर्णधार ऋतुराज गायकवाडने सांगितली पराभवाची कारणं

Nawazuddin Siddiqui Birthday : मेडिकल केमिस्ट- वॉचमॅन ते सुपरस्टार; जाणून घ्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा संघर्षमय प्रवास

Today's Marathi News Live: मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनला भीषण आग

Chakan Gas Tanker Explosion: पुण्यात गॅस टँकरचा स्फोट कसा झाला?, समोर आली धक्कादायक माहिती

Milk Powder : दूध नसल्यास तुम्हीसुद्धा मिल्कपावडरचा जास्त वापर करता? वाचा आरोग्यावर होणारा परिणाम

SCROLL FOR NEXT