Pm Modi and Amit Shah Saam tv
लोकसभा २०२४

Politics News : कालच शपथविधी, आज मंत्रिपद सोडण्याची इच्छा; भाजप खासदाराने सांगितली अनेक कारणं

Suresh Gopi Latest News : एनडीए सरकारच्या शपथविधीला काही तास उलटले असतानाच आता एका मंत्र्याने थेट मंत्रिपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) रविवारी (ता. ९) केंद्रात सत्तास्थापन केली. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत ७२ जणांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. या शपथविधीला काही तास उलटले असतानाच आता एका मंत्र्याने थेट मंत्रिपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सुरेश गोपी असं या मंत्र्याचं नाव आहे. मंत्रिपद सोडण्यामागे त्यांनी अनेक कारणं सांगितली आहे. सुरेश गोपी हे भाजपचे केरळमधील पहिले आणि एकमेव खासदार आहेत. रविवारी त्यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आज सोमवारी त्यांनी मंत्रिपद सोडणार असल्याचं सांगितलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सुरेश गोपी म्हणाले. "मी पक्षश्रेष्ठीकडे मंत्रिपद मागितलं नव्हतं. पण तरीही त्यांनी मला मंत्रिपद दिलं. आता ते मला या पदावरून मोकळं करतील अशी आशा आहे. मी अनेक चित्रपट साईन केले असून मला ते पूर्ण करायचे आहेत. तसेच खासदार म्हणून मला मतदारसंघाचा विकास करायचा आहे. त्यासाठी मला वेळ हवा आहे".

सुरेश गोपी हे केरळमधील त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. या राज्यातून निवडून येणारे ते भाजपचे पहिलेच खासदार आहेत. त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार व्ही. एस. सुनीलकुमार यांचा जवळपास ७५ हजार मतांनी पराभव केला आहे.

दरम्यान, सुरेश गोपी खासदार म्हणून निवडून येण्यापूर्वी राज्यसभेचे सदस्य होते. २०१६ मध्ये त्यांना राज्यसभेवर घेण्यात आलं होत. २०२२ पर्यंत त्यांचा राज्यसभेचा काळ होता. यानंतर त्यांना थेट लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं.

सुरेश गोपी हे केरळच्या अलप्पुझा येथील रहिवासी असून त्यांनी कोल्लम येथून सायन्स विषयात पदवी घेतली आहे. याशिवाय इंग्रजी लिटरेचरमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. सुरेश गोपी हे एक उत्कृष्ट अभिनेते आहेत. त्यांनी अनेक सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी - सुत्र

Maharashtra Election : निवडणुकीचे पडघम; नगरपालिका, नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

Lucky Zodiac Signs: पौर्णिमा तिथीच्या पवित्र योगात या राशी चमकणार! जाणून घ्या आजचं सविस्तर पंचांग आणि शुभ मुहूर्त

Budh Gochar 2025: राहूच्या नक्षत्रात आज होणार बुध ग्रहाचं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

SCROLL FOR NEXT