Kapil Patil  Saam TV
लोकसभा २०२४

Kalyan Lok Sabha: श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर करणे ही औपचारिकता होती: केंद्रीय मंत्री कपिल पाटील

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Kalyan Lok Sabha News:

श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर करणे ही औपचारिकता होती. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणे ही काळ्या दगडावरची रेष होती. मात्र कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांचे उमेदवारी जाहीर केल्याचे केंद्रीय राज्य मंत्री कपिल यांनी सांगितले. माध्यमांशी संवाद साधता ते असं म्हणाले आहेत.

आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थक व त्या भाजप कार्यकर्त्यांचे टोचले कान

शुक्रवारी कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी मागणी केली. तसेच तसं न केल्यास श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नसल्याचा इशारा दिला होता.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या आमदार गायकवाड यांच्या समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांच्या कान टोचलेत. या बैठकीबाबत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी, नेमकं काय झालं हे माहित नाही. याचे पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं उचित ठरणार नाही. मात्र एकदा आपल्या नेत्याने युती केल्यानंतर पक्षात असलेल्या लोकांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी अशा प्रकारची भूमिका घेणे उचित नाही.  (Latest Marathi News)

ते म्हणाले, आपल्या काही भावना असतील तर आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, नेत्यांपर्यंत पोहोचवून महायुतीच्या नेत्यांच्या समन्वयांमध्ये जे काही समस्या असेल तिचा निराकरण केलं पाहिजे. जाहीरपणे अशा प्रकारचे वाच्यता करणे हे उचित नाही, असे भाजपच्या लोकांनी असो किंवा शिवसेनेच्या लोकांनी असो किंवा आरपीआय, राष्ट्रवादी असो आपली महायुती आहे, हे आपलं कुटुंब आहे. कुटुंबामध्ये त्याची चर्चा होणे गरजेचे आहे, असं ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT