सातारा लाेकसभा मतदारसंघात गेल्या दाेन दिवसांपासून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर विराेधक कथित भ्रष्टाचाराचे आराेप करु लागले आहेत. त्यास आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील विविध नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला आहे. लेवेचा खून कोणी केला, कसा केला हे सातारकरांना आणि महाराष्ट्राला माहित आहे. दुस ऱ्यांचे मुडदे पाडणारे दुसऱ्यांवर घोटाळ्याचे आरोप करतात हे जरा आश्चर्यकारकच आहे जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
आव्हाड म्हणाले छत्रपतींच्या गादी बद्दल आम्हाला अत्यंत आदर आहे. मग ती कोल्हापूरची गादी असो अथवा साताराची गादी असो. वंशपरंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशांची गादी आहे ती कशाप्रकारे सांभाळली पाहिजे, काय आचार विचार कृत्य पाहिजे हे महाराष्ट्राला माहिती आहे.
त्यांची कृत्य दृकृत्य साताऱ्यात पण बघितली आणि सगळीकडे बघितली. आधीचा सन्मान राहील असं त्यांचं वागणं असतं तर ठीक आहे. दिल्लीच्या तक्ता पुढे चार दिवस नतमस्तक होऊन मला तिकीट द्या हे राजें नाही आवडलं नसेल.
दिल्लीच्या तक्ताला आव्हान देणार राजांपासून कायम एक नेतृत्व महाराष्ट्रात जन्माला आलं त्यांनी कायम दिल्लीच्या तक्ताला आव्हान दिलं आणि केवळ लोकसभेमध्ये उमेदवारी मिळावी यासाठी ज्यांना दिल्लीत दुनिया सलाम करते ते दिल्लीत जाऊन तिकीट द्या तिकीट द्या करत होते.
आव्हाड म्हणाले महाराष्ट्राची परंपरा आहे आजही सर्व मान त्या गादीला जातात. त्या गादीची किमान तरी इज्जत ठेवायला हवी होती. आपण कोणासमोर झुकतो आहोत काळ झोपतो आहोत हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
शशिकांत शिंदे हा अत्यंत गरीब घराण्यातून आलेला माणूस आहे, त्यांच्या घरची परिस्थिती काय होती हे राजेंनाही माहिती आहे. शरद पवारांनी कायम ज्याच्याकडे नेतृत्व करण्याची ताकद,हिम्मत, कर्तुत्व आहे त्यांना मोठं केलंय, त्याचा वारसा काय हे कधीच बघितलं नाही. शशिकांत शिंदे हा गरीब घरातला माथाडी कामगार आहे अशा पार्श्वभूमीवर त्यांनी राजेंना अंगावर घेतला आहे. त्यामुळे खरा रयतेचा प्रतिनिधी शशिकांत शिंदे आहे असे आव्हाडांनी नमूद केले. शशिकांत शिंदेच जनतेला न्याय देऊ शकतात. सत्तेपुढे नतमस्तक होणारे कधीच न्याय मिळवून देऊ शकत नाही असा चिमटा आव्हाडांनी विराेधकांना काढला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शाहू महाराजांना जसं घरी बसून तिकीट दिलं, त्यांना कुठे तिकीट द्या तिकीट द्या करत फिरावं लागलं नाही, साताऱ्याच्या गादीचा इतिहास फार मोठा आहे अशाप्रकारे तिकीट मिळवणं म्हणजे त्या गादीचा अपमान आहे.
तुम्ही ज्याचा वारसा सांभाळता त्या गादीने एकेकाळी दिल्लीला आव्हान दिलं होतं, त्या गादीवर बसलेला वारसा हक्क जपलेला हा जर दिल्ली पुढे नतमस्तक होत असेल तो तुमचा नाही तर उभ्या महाराष्ट्राचा अपमान आहे असे आव्हाडांनी उदयनराजेंवर टीका करताना म्हटले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.