Raosaheb Danve  Yandex
लोकसभा २०२४

Jalna Lok Sabha: 'मी राजकारणातली सासू, अर्जुन खोतकर माझी सून'; जालन्यात रावसाहेब दानवेंची मिश्किल टिप्पणी

Raosaheb Danve On Arjun Khotkar: रावसाहेब दानवे यांची जालन्यातील गोलापांगरी येथे सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांना अर्जुन खोतकर सून असल्याची मिश्किल टिप्पणी केली आहे.

Rohini Gudaghe

जालना लोकसभा मतदारसंघात (Jalna Lok Sabha) महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे आहेत. त्यांची काल जालन्यातील गोलापांगरी येथे सभा पार पडली. या सभेदरम्यान बोलताना त्यांनी अर्जून खोतकर यांना सुन असल्याचं म्हटलं आहे. मी (Raosaheb Danve) राजकारणातली सासू आहे आणि अर्जुन खोतकर माझी सून आहे, अशी मिश्किल टिप्पणी जालना लोकसभा महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

मी राजकारणातली सासू आहे आणि अर्जुन खोतकर माझी सून आहे, अशी मुश्किल टिपणी जालना लोकसभा महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खोतकर आणि दानवे यांच्यामध्ये निर्माण झालेला दुरावा दूर झालाय. त्यानिमित्ताने दोन्हीही नेते प्रचारासाठी एकत्रित दिसले. रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जालन्यातील गोलापांगरी येथे झालेल्या सभेदरम्यान रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मी चांगलं काम केलं, तुम्ही मला खासदार केलं. पैसा आणणं माझं काम आहे. मी राजकारणातील सासु आहे. अर्जुनराव माझी सून आहे, एकदा की सुनेच्या हातात कारभार गेला की, सासुला फक्त आणायला (Raosaheb Danve On Arjun Khotkar) सांगतात. वाटायला सूना असतात, असं दानवे म्हटले आहेत. वाटत असेल तर पुढच्या वेळी अर्जुनराव यांना खासदार करा अन् मला आमदार करा, मग मी गावोगावी फिरेन असं दानवेंनी म्हटलं आहे.

जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रावसाहेब आणि काँग्रेसकडून कल्याण काळे यांच्यात लढत होणार आहेत. यावेळी प्रचार सभेदरम्यान बोलताना दानवे म्हणाले (Maharashtra Politics) की, वाटत असेल तर पुढच्या वेळी अर्जुन खोतकर यांना खासदार करा. मला आमदार करा, असं आवाहन देखील दानवेंनी त्यांच्या भाषणातून मतदारांना केलं आहे. जालन्यामध्ये चौथ्या टप्प्यात निवडणुका पार पडणार आहे. १३ मे राजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून प्रचाराला वेग आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: "स्वतःच्या अंगाशी आलं की ते राजकारण"; मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंनी सरकारला सुनावलं

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

SCROLL FOR NEXT