Rahul Gandhi On PM Narendra Modi Saam Tv
लोकसभा २०२४

Rahul Gandhi: देशानं सांगितलं, मोदी, शाह आम्हाला नको: राहुल गांधी

Lok Sabha Election Result Latest Update : देशानं सांगितलं, मोदी, शाह आम्हाला नको, असं काँग्रेस नेते राहील गांधी म्हणाले आहेत.

Satish Kengar

देशानं सांगितलं, मोदी, शाह आम्हाला नको, असं काँग्रेस नेते राहील गांधी म्हणाले आहेत. आज लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात काँग्रेला मोठं यश मिळालं आहे. यातच आज पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी असं म्हणाले आहेत.

यावेळी पत्रकारांनी राहुल गांधी यांना प्रश्न विचारला की, विरोधी पक्षात राहणार की सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करणार? यावर त्यांनी उत्तर दिले की, इंडिया आघाडीशी चर्चा करूनच आम्ही उत्तर देऊ.''

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, “आम्ही युतीचा भाग आहोत. काँग्रेस आणि इतर पक्ष आहेत. त्याच्याशी याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. निवडणुकीनंतर ५ जूनला बैठक होणार असून त्यात या प्रश्नावर चर्चा होणार असल्याचे आम्ही आघाडीतील पक्षांना सांगितले होते. या प्रश्नाचे उत्तर उद्या मिळेल.''

काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत राहुल म्हणाले की, ''तुम्ही देशाचे संविधान वाचवण्यासाठी सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. काँग्रेसने देशाला गरीब समर्थक दृष्टिकोन दिला आहे. सार्वत्रिक निवडणुका ही संविधान वाचवण्याची लढाई असल्याचेही ते म्हणाले. भारतातील सर्वात गरीब आणि मागासलेले लोक संविधान वाचवण्यासाठी उभे राहिले.''

उत्तर प्रदेशमधील काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या कामगिरीत झालेल्या सुधारणांबाबत राहुल गांधी म्हणाले की, ''यूपीच्या जनतेने आश्चर्यकारक काम केले आहे. याचे श्रेयही त्यांनी पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांना दिले.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फरहानानंतर कोण बनला 'Bigg Boss 19'च्या घराचा नवा कॅप्टन?

Navapur : आश्रम शाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू; नवापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

म्हाडाची बंपर ऑफर! मुंबईतील प्राईम लोकेशनवरील घरांची थेट विक्री, घरे भाड्यानं देण्यासही तयार

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् व्याजातून कमवा लाखो रुपये

Maharashtra Live News Update: धुळे जिल्ह्यासह जवळच्या जिल्ह्यांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

SCROLL FOR NEXT