Prakash Ambedkar on Pm Modi and Uddhav Thackrey Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मत म्हणजे मोदींना मत, भाजप-ठाकरेंवर प्रकाश आंबेडकर कडाडले

Prakash Ambedkar: उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आतून मिलीभगत आहे. उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे ते मत मोदींना जाणार, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकार आंबेडकर यांनी केलं आहे.

Satish Kengar

Prakash Ambedkar On Uddhav Thackrey:

उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आतून मिलीभगत आहे. उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे ते मत मोदींना जाणार, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकार आंबेडकर यांनी केलं आहे. शिर्डीत आज वंचितची सभा पार पडली. याच सभेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे.

सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करत ते म्हणाले की, ''जहागिरदारी संपत नाही, तोपर्यंत इथला विकास होईल, असे वाटत नाही. नगर जिल्ह्याची सत्ता कुटुंब आणि नात्यागोत्यात राहिली आहे. यामुळे खऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही. म्हणून इथले प्रश्न व्यवस्थित मांडले गेले नाही.''

आंबेडकर म्हणाले की, ''2012 मध्ये सोनिया गांधी यांनी गुजरातच्या एका सभेत नरेंद्र मोदी यांना मौत का सौदागर संबोधले होते. त्यावेळेस मोठं वादळ उठलं. काँग्रेसवाल्यांना म्हटलं की, याच्याविरोधात आवाज उठवा काँग्रेसवाले म्हणाले की, तुम्हीच आवाज उठवा. कारण आम्ही आवाज उठवला तर, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि खरगे यांना तुरुंगात जावं लागेल.''

प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की, ''2014 पासून 17 लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडले.'' ते म्हणाले, देशाचे कर्ज 100 पैकी 26 रुपये होते, ते आता 84 रुपये झाले. हे कर्ज आगामी काळात 96 रुपये होणार असून 4 रुपये देश चालवण्यासाठी राहणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT