Sangli Lok Sabha Saam Tv
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha: अडचण होत असेल तर उमेदवारी मागे घेणार, चंद्रहार पाटील यांचं मोठं वक्तव्य

Chandrahar Patil: एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. माझी आणि माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल, तर मी उमेदवार मागे घेण्यास तयार असल्याचं वक्तव्य सांगली लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sangli Lok Sabha Constituency News:

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. माझी आणि माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल, तर मी उमेदवार मागे घेण्यास तयार असल्याचं वक्तव्य सांगली लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी केलं आहे.

फक्त शेतकऱ्यांचा मुलगा खासदार व्हायला नको, हे काँग्रेसने उघडपणे येऊन सांगावे. मान्य आहे, माझ्याकडे कारखाना नाही, मी माजी मुख्यमंत्र्यांचा नातू नाही, असंही ते म्हणाले आहेत. आज सांगलीत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. यामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करता ते असं म्हणाले आहेत. यावेळी जयंत पाटील, शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे-पाटीलही मंचावर उपस्थित होते.

चंद्रहार पाटील म्हणाले की, ''शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मातोश्रीवर गेलो असतो उद्धव ठाकरे यांनी माझ्या उमेदवारीची घोषणा केली. मिरज येथे उद्धव ठाकरे यांची मोठी सभा पार पडली, तिथे दुसऱ्यांदा उमेदवारीची घोषणा झाली. तिसऱ्यांदा पक्षाच्या वतीने अधिकृतपणे पत्राद्वारे माझ्या उमेदवारीची घोषणा झाली. चौथ्यांदा महाविकास आघाडीच्या पत्रकात माझ्या उमेदवारीची घोषणा झाली.''

ते म्हणाले, ''एका उमेदवाराची चारवेळा घोषणा होऊन सुद्धा अजून आपले मित्रपक्ष आपल्यापासून लांब आहेत. नेमकं त्यांचं दुखणं काय आहे, हे अजूनही माझ्या लक्षात आलं नाही. एका शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतोय, हे तुमचं दुखणं आहे? की, शिवसेना पक्षाची ताकद येथे कमी आहे, हे तुमचं दुखणं आहे?''

चंद्रहार पाटील पुढे म्हणाले, ''महाविकस आघाडी ही फक्त सांगलीपुरती नाही. महाविकास आघाडीही संपूर्ण महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडीही देशात काम करत आहे. त्यामुळे नेमकं यांचं काय दुखणं आहे, हे माझ्या लक्षात आलं नाही.''

विशाल पाटील याणी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

दरम्यान, सांगलीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. येथे विशाल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली नसल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचसोबत आता विशाल पाटील हे उद्या शक्तीप्रदर्शन करत काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूड! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार

Maharashtra Live News Update: - पुणे आहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव येथे वाहतुककोंडी

Health Tips: फळं खाल्ल्यानंतर पचण्यासाठी किती वेळ लागतो?

शुभमन गिल ठरला जगातला एकमेव खेळाडू; ICC कडून चौथ्यांदा खास पुरस्कार

Dhule MIM : धुळ्यात एमआयएमला मोठा धक्का; जिल्हा कार्यकारिणीचा सामूहिक राजीनामा

SCROLL FOR NEXT