Raju Shetti Speech
Raju Shetti Speech SaamTvNews
लोकसभा २०२४

Raju Shetti Speech: मी तुमच्या शेतातला म्हसोबा; मला मत द्या... राजू शेट्टींची मतदारांना भावनिक साद!

Gangappa Pujari

सांगली|ता: २५ एप्रिल २०२४

"प्रत्येकाच्या शेतामध्ये म्हसोबा असतो. तो शेताची राखण करत असतो. त्यामुळे तुम्ही वर्षाला परडी सोडता. तसेच मी तुमच्या उसाची राखण करतो तुमच्या उसातला म्हसोबा मीच आहे. त्यामुळे मला मत द्यायचे आहे," अशी भावनिक साद राजू शेट्टी यांनी केली आहे. ते सांगलीच्या येडे मच्छिंद्र येथे प्रचार शुभारंभावेळी बोलत होते.

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी निवडणूक लढवत आहेत. त्यांनी सांगलीच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भूमीत येऊन प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी गावातून बैलगाडी मधून त्याची रॅली काढण्यात आली. स्वतः राजू शेट्टी यांनी यावेळी बैलगाडी चालवली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राजू शेट्टी यांनी भावनिक आव्हान केले.

काय म्हणाले राजू शेट्टी?

"ही निवडणूक माझी नाही तुमची आहे. कारण खोके बहाद्दूर बाजूला आहेत. दबावतंत्र आहे. गुन्हे दाखल होत आहे. पण या साऱ्यांना चितपट करून लोकसभेत मीच जाणार आहे. सगळ्यांनी मोबाईलवरून शिट्टीला मतदान करा असेही राजू शेट्टी (Raju Shetti) यावेळी म्हणाले.

तसेच "माझा हात जन्माला आल्यापासून स्वछ आहे आणि मरेपर्यंत स्वछ राहणार आहे. कारण जनता मला निवडणूक लढवण्यासाठी पैसे देते. ज्या दिवशी तुमचा पैसा यायचा बंद होईल. त्या दिवशी मी निवडणूक लढणार नाही. असेही राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान, हातकणंगले मतदार संघात महायुतीकडून धैर्यशिल माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून सत्यजित आबा पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबदेवीच्या दर्शनाला

Paru And Aditya Wedding : 'पारू'च्या नव्या प्रोमोने वेधलं लक्ष, पारू आणि आदित्यचं लग्न होणार पण...

Home Tips: पावसाळा येतोय! तर घरातील लाकडी फर्निचरची घ्या अशी काळजी

Lok Sabha Election: डॉ.मनमोहन सिंह आणि हमीद अन्सारी यांनी घरून केलं मतदान, वयोवृद्ध मतदारांसाठी आयोगाने केली विशेष व्यवस्था

Priyanka Gandhi : माझ्या शहीद आजी आणि शहीद वडिलांना देशद्रोही बोलल्यावर गप्प का बसू? प्रियांका गांधी कडाडल्या

SCROLL FOR NEXT