ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरु होण्याआधी आपण घरासंबंधित अनेक कामे करुन घेतो,ज्यामुळे पावसामुळे घरातील सामानाचे नुकसान होणार नाही.
त्यात पावसाळा सुरु होताच लाकडी वस्तुची अधिक काळजी घ्यावी लागते.चला तर जाणून घेऊयात घरातील लाकडी फर्निचरची काळजी कशी घ्यावी.
लाकडी फर्निचरची पावसाळ्यात खिडकीपासून लांब ठेवावे,जेणेकर पावसाचे पाणी फर्निचरवर उडणार नाही.
पावसाळ्यात अनेकदा घरातील भिंती ओल्या होतात,त्यामुळे अशा भिंतीपासून फर्निचर लांब ठेवावे.
पावसाळ्यात घरात कोणत्याही पद्धतीचे रिनोवेशन काम सुरु करु नका.
पावसाळ्यात लाकडी फर्निचर असलेल्या कपाटात तुम्ही कडुलिंबाची पाने किंवा लवंगा ठेवाव्यात.
लाकडी फर्निचर साफ करताना ओल्या कापडाचा वापर करु नये.
NEXT: सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्ही ह्या करु नका चुका