Amit Shah and Narendra Modi SAAM TV
लोकसभा २०२४

Loksabha Election Result: ब्रेकिंग! देशातील पहिला निकाल लागला; मतमोजणीआधीच भाजपने खातं खोललं

Loksabha Election Result 2024: देशातील सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासात जाहीर होणार आहेत. पंतप्रधान मोदी हॅट्रिक साधणार की इंडिया आघाडी धक्का देणार? याचे चित्र काही तासात स्पष्ट होणार आहे. त्याआधीच भारतीय जनता पक्षाने एका जागेवर गुलाल उधळला आहे.

Gangappa Pujari

देशभरातील सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल आज समोर येत आहे. अवघ्या काही तासात मतमोजणीला सुरूवात होणार असून मतदार राजा कुणाला कौल देणार? याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी भारतीय जनता पक्षाने निकालाआधीच गुजरातमधील एका लोकसभेत विजय मिळवून पहिला गुलाल उधळला आहे.

देशातील लोकसभा निवडणुकांची मतमोजणी काही वेळात सुरू होणार आहे. मात्र मतमोजणी सुरू होण्याआधीच भारतीय जनता पक्षाने एका जागेवर विजय मिळवला आहे. गुजरातमधील सुरत लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहेत. याठिकाणी काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला होता.

प्रमुख विरोधी उमेदवाराचा अर्जच बाद झाल्यामुळे दलाल यांचा विजय निश्चित होता. तर निलेश कुंभानी यांचा अर्ज बाद झाल्यानंतर या ठिकाणी निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांनीही आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे निलेश कुंभानी यांचा विजय झाला. या विजयासोबतच भारतीय जनता पक्षाने लोकसभा निकालाआधीच गुलाल उधळत खाते खोलले आहे.

दरम्यान, देशभरात आज लोकसभेच्या निकालाचा धुरळा पाहायला मिळणार आहे. ४०० पारचा नारा दिलेला भाजप पुन्हा हॅट्रिक साधणार की इंडिया आघाडी धक्का देणार? याबाबतचे चित्र अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT