Loksabha Election 2024:  saam tv
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024: गुजरातमध्ये भाजपला धक्का! २ बड्या नेत्यांनी उमेदवारी नाकारली; निवडणूक लढण्यास नकार

Gangappa Pujari

Gujrat Loksabha Election 2024:

देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. ४०० पार चा नारा देत भारतीय जनता पक्षाने लोकसभेची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच भाजपला गुजरातमध्ये मोठा धक्का बसला असून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन बड्या नेत्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणी भाजपला नव्या उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, साबरकांठा येथील भाजपचे उमेदवार भिकाजी ठाकोर आणि वडोदरा मतदारसंघातील भाजप उमेदवार रंजनबेन भट्ट यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी लोकसभा लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता या दोन्ही जागांवर भाजपला नवे उमेदवार निवडावे लागणार आहेत.

वडोदरा लोकसभा जागेसाठी रंजनबेन भट्ट यांच्या नावाची घोषणा झाल्यापासून भाजपमध्ये विरोध सुरू झाला आहे. रंजनबेन भट्ट यांच्या नावाला भाजप नेत्या ज्योतिबेन पंड्या यांनी विरोध केला होता. त्यांच्या नावाचा निषेध करणारे बॅनरही शहरातील विविध भागात लावण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. वैयक्तिक कारणांमुळे २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच साबरकांठा येथील भाजपचे उमेदवार भिखाजी ठाकोर यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली आहे. मात्र निवडणुक न लढण्याचे कारण मात्र त्यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या लगबगीत भाजपला नवा उमेदवार शोधाला लागणार आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT