Anuradha Paudwal BJP:  Saamtv
लोकसभा २०२४

Anuradha Paudwal Join BJP: 'जय श्रीराम'चा नारा देत ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजप प्रवेश; लोकसभेच्या रिंगणात उतरणार?

Gangappa Pujari

Anuradha Paudwal Join BJP:

लोकसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजणार आहे. त्याआधी मनोरंजन जगतातही मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजप पक्ष कार्यालयात अनुराधा पौडवाल यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) प्रसिद्ध गायिका अनुराधा पौंडवाल यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दिल्लीमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांंचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. 80 आणि 90 च्या दशकात हिट गाण्यांसाठी आणि भक्ती संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या अनुराधा पौडवाल यांनी लोकसभेच्या तोंडावर राजकारणात एन्ट्री केल्याने त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना "सनातन धर्माशी सखोल संबंध असलेल्या सरकारमध्ये सहभागी होताना मला आनंद होत आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. मी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे हे माझे भाग्य आहे," असे अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) म्हणाल्या.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, अनुराधा पौडवाल या भारतीय संगीत जगतातील प्रसिद्ध गायिका आहे. 90 व्या दशकात बॉलिवूड (Bollywood) तसंच भक्तीगीतांनी त्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केले. अनुराधा पौडवाल यांनी हिंदी, कन्नड, राजस्थानी, मराठी, संस्कृत. गुजराती, तामिळ, तेलुगू, पंजाबी, भोजपुरी, नेपाळी आणि मैथिलीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी तब्बल 1500 भजनं गायली आहेत. (Latest Marathi New)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

Suvarna Dhanorkar : लय भारी! सामाजिक भान, साम टीव्हीच्या अँकरचं केशदान...

Rahul Gandhi: आरक्षणाची 50 % मर्यादा वाढवा, शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीचीही मागणी; भाजपची होणार कोंडी?

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT