Madha Lok Sabha Election Candidate Dhairyashil Mohite Patil Vs Ranjeetsinh Naik Nimbalkar Saam TV
लोकसभा २०२४

Madha Lok Sabha Constituency: पवारांचा डाव भाजपवर भारी पडणार! माढ्यात 'कमळ' कोमेजणार; मोहिते पाटलांची 'तुतारी' जोरात वाजणार?

Gangappa Pujari

माढा: ता. २ जून २०२४

लोकसभा निवडणुकांच्या निकालाला अवघे दोन दिवस उरलेत. त्याआधी विविध वृत्तसंस्थांनी निवडणूकांचे एक्झिट पोल जाहीर केले असून यामध्ये अनेक ठिकाणी दिग्गजांना धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्यामध्य सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या माढा लोकसभा मतदार संघातही भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता असून रणजित सिंह निंबाळकर यांच्याविरोधात धैर्यशिल मोहिते पाटील बाजी मारताना दिसत आहेत.

राज्यातील लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आला होता माढा मतदार संघ. भारतीय जनता पक्षाने रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा दिलेली उमेदवारी. निंबाळकरांच्या उमेदवारीने पसरलेली नाराजी हेरत शरद पवार यांनी धैर्यशिल मोहिते पाटील यांना दिलेल्या उमेदवारीमुळे माढ्यात राजकीय राडा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाची तुतारी घेऊन मैदानात उतरलेल्या मोहिते पाटील यांना उत्तम जानकर, फलटणचे निंबाळकर यांचीही साथ मिळाली.

त्यामुळेच माढ्यामध्ये धैर्यशिल मोहिते पाटील यांचे पारडे सुरूवातीपासून जड होत असल्याचे पाहायला मिळाले. तसेच अंदाज आता एक्झिट पोलनेही दाखवले आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार माढ्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शरद पवारांचा डाव यशस्वी ठरणार का? हे ४ जूनच्या निकालातून स्पष्ट होईल.सोप

दरम्यान, माढा लोकसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षाने मोठी ताकद लावली होती. शरद पवार यांच्या प्रत्येक डावपेचाला शह देण्याची तयारी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र मोहिते पाटील यांना डावलण्याची मोठी किंमत भारतीय जनता पक्षाला मोजावी लागणार असल्याचे चित्र समोर आलेल्या एक्झिट पोलमधून दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPSC Success Story : वाह रे पठ्ठ्या! २ वेळा JEE पास करून IIT सोडलं; UPSC उत्तीर्ण होऊन IAS पदाचा राजीनामा, कोण आहे 'हा' जिगरबाज तरूण?

Chembur Fire News : चेंबूरमधील आग दुर्घटनेची CM शिंदेंकडून पाहणी; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहिर

Curd Rice Recipe:रोजच्या पोळी भाजीचा कंटाळा आलाय? मग करा झटपट कर्ड राईस

Jalgaon Crime : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; जळगावतील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : संभाजी राजे अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या शोधासाठी रवाना

SCROLL FOR NEXT